Ticker

6/recent/ticker-posts

अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांचे धिक्कार आंदोलन

प्रतिनिधी।कारंजा

देशात अंदाधुंद कारभार सुरू असून लोकशाही मध्ये कायद्याची पायमल्ली होत असून सर्वसामान्य जनतेवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत या बाबीला गांभीर्याने घेत  विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्थानीय तहसील कार्यालयासमोर १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धिक्कार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.याबाबत सविस्तर असे की,
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देश भारत उत्साहात आनंदाने साजरा करताना त्याच दिवशी माठाच्या पाण्याला हात का लावला ?म्हणून निरागस इंद्रकुमार मेघवाल या ९ वर्षाच्या बालकाला अमानुष व क्रूरपणे त्याची हत्या केली जाते तो अनुसूचित जातीचा असल्यामुळे,त्याच अमृत महोत्सवात ज्यांनी बिलकीस बानो यांचेवर बलात्कार करून तिच्या ३ वर्षाच्या मुली,आई व कुटुंबातील इतर लोकांची निर्घृणपणे हत्या केली त्या खून करणाऱ्यास,बलात्काऱ्यास मोकळे सोडून दिले जाते यामधून समाजाने काय संदेश घ्यावा बिलकीस बानो अल्पसंख्याक असल्यामुळे, सुनीता खाका यांना ८ वर्षे घरात डांबून तिच्यावर अमानवीय अत्याचार केला जातो त्यांना अनैसर्गिक शिक्षा सीमा पात्रा करतात जे गुन्हे फक्त निंदनीय नसून मानवतेचा अपमान करणारा आहे.ती अनुसूचित जातीची असल्यामुळे,
सरकारची जबाबदारी आहे की घटनेच्या अनुच्छेद २१ नुसार जनतेच्या जीवनाचे संरक्षण करणे आणि तसे होत नसल्यामुळे  या सर्व घटनेचा धिक्कार करण्यासाठी सै. अहेमद कबीर दर्गा ट्रस्ट अध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,समाज क्रांती आघाडीचे हंसराज शेंडे,बिरसा क्रांती दलाचे राजेश मस्के,गजानन अमदाबादकर आदींसह  सामाजिक समता प्रबोधन मंच, गोर सेना,लहुजी शक्ती सेना, संभाजी ब्रिगेड,अखिल भारतीय गोपाळ समाज विकास परिषद, भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संघटना, विदर्भ बुरुड समाज संघटना, ओ.बी.सी. कर्मचारी संघटना, माळी कर्मचारी सेवा मंडळ भटक्या विमुक्त जमाती फेडरेशन ऑफ इंडिया,भारतीय ओ.बी.सी. संघटना, बुध्दीष्ट विचार संघ, वाल्मीक मेहतर समाज संघटना, भोई समाज फेडरेशन (म.रा.),मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,नाभिक समाज संघटना, कुंभार समाज संघटना (म.रा.),अण्णाभाऊ साठे महासंघ, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ शाखा कारंजा आदी सामाजिक संघटनाच्या वतीने धिक्कार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना कारंजा तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देऊन,बिलकीस बानो प्रकरणातील अत्याचारी,बलात्कारी व खूनकरी यांना पूर्ण शिक्षा कायम करावी,इंद्रकुमार मेघवाल यांच्या मारेकऱ्यांस फाशी व्हावी,सुनीता खाका यांच्यावर अमानवीय अत्याचार करणाऱ्या सिमा पात्रास आजीवन कारावास व्हावा.,महागाई वर निर्बंध लावावे,एस सी,एस टी, ओबीसी,मायनॉरिटी वर होणारे अन्याय,अत्याचार थांबवावे व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली.यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, कारंजा नप पदाधिकारी, नगरसेवक तथा बहुसंख्य नागरिक व महिलांनी उपस्थिती दर्शवली.

Post a Comment

0 Comments