लेकी बाळी चा केला सन्मान .
मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम चेहेल येथे ५७ वर्षाची परंपरा कायम राखत दूर दुरून आलेल्या लेखी पाळीचा सन्मान करून बाप्पाला निरोप देण्यात आला. नवश्या गणपती बाप्पाला
गेल्या ५७ वर्षा पासून टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने नवश्या गणपती बाप्पाला निरोप दिल्या जातो . एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली ५७ वर्षापासून अजूनही कायम आहे.
तसेच महाआरतीचा बहुमान मंगरूळपीर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती शितलताई बंडगर व त्यांच्या आई-वडिलां सह यांना महा पूजेचा मान मिळाला असूनन पूजा करून महाआरती झाल्या नंतर. काल्याचे किर्तन ह.ब.प. वामन महाराज जांभरुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर 12 वाजता महाप्रसाद सुरुवात झाल्या नंतर पंचकोशीतील भाविकांनी संध्याकाळी ७ वाजे पर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला.
सर्व दु:खांचा विनाश करून पुढील वर्षी नवश्या गणपती बाप्पा लवकर येऊ दे या कामने सह बाप्पाला निरोप देण्या साठी सर्व जाती धर्माच्या लेखी व जावई यांचा सन्मान करण्यात आला व तसेच गावातील नातेवाईका सह पंचकोशीतील भाविक या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनंत चतुर्दशी नावाप्रमाणेच हे चतुर्दशी तिथीला साजरी केले जाते. भाद्रमासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते .
जेव्हा भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मिती साठी १४ लोकांची निर्मिती केली. हे १४ लोकं तल, अतल, वितल, सुतल, सलातल, रसातल, पाताल, पृथ्वी, भव:, स्व:, जन, तप, सत्य, मह आहेत. म्हणून भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले. यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला. आणि तेव्हापासून विविध ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना सुरू झाली. आलेले संकट निवारण्यासाठी भक्त वेगवेगळ्या मार्गाने देवाला स्मरण करू लागले.
भक्ती भावानी ५७ वर्षांपूर्वी द्वारकाबाई देविदास चौधरी यांनी आपल्या सासूबाईला विचारून नवश्या गणपती बाप्पाची स्थापना केली यामागचा काही थोडासा इतिहास म्हणजे द्वारकाबाईची लहान मुलगी नंदाबाई तिचे दोन्ही पायाला अपंगत्व आल्याचे अकोल्याच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर द्वारकाबाई व परिवार दुःखी झाला होता. . द्वारकाबाईंनी आपल्या भक्ती भावानुसार नवश्या गणपती बाप्पाची आराधना करून नंदाबाई बरी झाली तर तुझी स्थापना करील असं व्रत केलं होतं. दुसऱ्या दिवशी नंदाबाई सकाळी चालायला लागली. नंतर १९६५ साली नवश्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली . आज ५७ वर्षे पूर्ण झाले असून एक गाव एक गणपती गेली ५७ वर्षाची परंपरा कायम राखत हा उत्सवाचा कार्यक्रम पार पडला तसेच डॉ.दत्तात्रय चौधरी यांच्या मार्गदर्शनाबखाली या मंदिराची देखभाल, व्यवस्थापन केले जाते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते,
गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण ,गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण, पोथी, किर्तन, प्रवचन, हरिपाठ इत्यादी कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडतात. नवशा गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी सर्व धर्मीय एकात्मतेचा संदेश या मिरवणुकीच्या वेळी पाहण्यास मिळाला
या वेळी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे चंद्रकांत दादा ठाकरे, तहसीलदार शितलताई बंडगर, मा. नायब तहसीलदार दिलीप चौधरी,
डॉक्टर दत्तात्रय चौधरी, शेषराव चौधरी,
भाऊरावजी व्यवहारे , अरुण भाऊ इंगळे , नवधर साहेब, नाना पाटील राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद भाऊ चौधरी, पोलीस पाटील सुनील चौधरी, केशवरावजी चौधरी, काशीरामजी चौधरी, महादेव चौधरी, दादाराव चौधरी, कैलास पाटील, मुरलीधर चौधरी, पंजाब चौधरी, मोतीराम राठोड, भीमराव सोनोने, नाना चौधरी, वसंता चौधरी, प्रकाश पाटील, बबन इंगोले, अशोक मनवर, गजानन चौधरी, किशोर चौधरी, पंचकोशीतील सर्व नागरिकांनी उत्सवात सहभागी होऊन .
गणपती उत्सव शांततेत पार पडला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments