Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासनाला कंटाळून इच्छा मरणाच्या परवानगीची मागनी , गोपाल मस्के, सुहेल रहेमान शेख




   ता. मंगरुळपीर जि. वाशिम. अनुकंप नियुक्ती बाबत जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम व नगर परिषद कार्यालय, मंगरुळपीर यांना वारंवार अर्ज करूनही मा. जिल्हाधिकारी साहेब आपणास प्रत्यक्ष दोन वेळेस भेटूनही तदनंतर वारंवार अर्ज करूनही नगर परिषद मंगरुळपीर कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही . मंगरूळपीर  नगर परिषद मध्ये कायमस्वरुपी मुख्याधिकारी  नसल्यामुळे कार्यालयातील सर्व कामे रखडलेली आहेत आम्ही वारंवार जाऊन सुध्दा कोणत्याही प्रकारची दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्यात येत नाही. आम्हाला रोजगार नसल्यामुळे  आमच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झाली आहे .आम्ही कर्जबाजारी झालो आहोत आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्हाला दोन वेळचे जेवनासाठी सुध्दा तडजोड करावी लागत आहे.  साहेब आमची वयोमर्यादा संपल्यास आम्ही काय करावे आमची परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्हाला विचार सूचत नाही आहे. तरी आम्हाला इच्छामरणाची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे  2 / 9/ 2022 रोजी दिलेल्या निवेदनावर अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. निवेदनकर्त्याच्या म्हणण्यानुसार 7 दिवसाचे आत कार्यवाही करावी, आमचे जिवाचे 'काहीही बरे-वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील. असे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments