मुर्तिजापूर- २४वी राज्यस्तरीय सबज्युनीयर/ज्युनीयर टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा २०२२-२३ चिखली ( बुलढाणा) येथे दि. २३ ते २५सप्टेंबर २०२२ दरम्यान संपन्न होणार आहे. या करीता महाराष्ट्र राज्य टेनीस व्हॉलिबॉल संघटनेच्या वतीने स्पर्धेसाठी निरीक्षक पदी क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ता-संघटक जयकुमार उर्फ जयदीप शंकरराव सोनखासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतीत
टेनिस व्हॉलीबॉल, महाराष्ट्र असोसिएशनचे सचीव गणेश माळवे यांचे पञ त्यांना प्राप्त झाले असून राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करून आयोजकांना मार्गदर्शन करावे असे कळविण्यात आले आहे.
जयदीप सोनखासकर हे टेनीसव्हॉलिबॉल खेळाचे अमरावती विभागीय सचीव म्हणून कार्यरत आहेत.तसेच अकोला जिल्हा टेनीसव्हॉलिबॉल असोसिएशन च्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर आहेत.खेळाडू जीवनात महाराष्ट्र टेनीसव्हॉलिबॉल पुरूष संघाचे कर्णधार राहिले असून राष्ट्रीय खेळाडू आहेत.मागील वर्षी मिनी व युथ गटातील टेनीसव्हॉलिबॉल स्पर्धा मुर्तिजापूर जि.अकोला येथे त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्या होत्या.याआधी राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.त्यांच्या नियुक्तीबद्दल बुलढाणा जिल्हा टेनीसव्हॉलिबॉल असोसिएशन सह क्रीडाक्षेञात स्वागत होत आहे.
0 Comments