मंगरूळपीर दि. 15 -9-22 जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था मंगरूळपीर यांच्यावतीने तहसील कार्यालय मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह तहसील कार्यालय तसेच नगर परिषद व मंगरूळपीर मध्ये इतर ठिकाणी असावे यासाठी निवेदन देण्यात आले. जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अश्विनीताई औताडे मंगरूळपीर मध्ये महिलांसाठी काम करतात यामध्ये महिलांचा आरोग्य व स्वच्छता हा पण प्रश्न आहे. त्यानुसारच तहसील कार्यालय महिलांसाठी चांगले स्वच्छतागृह नसल्यामुळे येथे मागील एका वर्षाच्या अगोदरच उपविभागीय अधिकारी यांना भेटून हा विषय घेतला होता तरी पण अद्यापही कोणतीही हालचाल झालेली नाही त्यामुळे इथे कार्यरत असलेला महिला वर्ग आणि तसेच तहसील कार्यालय मध्ये बाहेरून येणारा महिलावर्ग यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते, चांगले स्वच्छतागृह नसल्यामुळे थेट या महिलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते एकदा घरातून बाहेर पडल्यावर जर तिथे चांगले स्वच्छतागृह नसले तर घरी जाण्याशीवाय पर्याय नसतो जिथे महिलांना सात ते आठ तास ड्युटी करावी लागते अशा ठिकाणी त्यांच्यासाठी स्वच्छ स्वच्छतागृह असणे हे गरजेचे आहे तसेच नगरपरिषद व आठवडी बाजार ,अकोला चौक, बस स्टॅन्ड तसेच इतर ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. मागील तीन वर्षापासून अश्विनीताई महिलांच्या आरोग्य व स्वच्छता, शिक्षण याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करत आहेत तसेच महिलांसाठी शासकीय कार्यालय मध्ये चांगले स्वच्छतागृह व त्या स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी वेडिंग मशीन व सॅनिटरी डिस्पोजल मशीन बसवण्यासाठी जनजागृती चालू आहे त्या माध्यमातूनच पोलीस स्टेशन येथे पण मशीन लागली तसेच तहसील कार्यालय मध्ये पण स्वच्छतागृह व त्यामध्ये ह्या मशीन लावण्यात याव्या जेणेकरून सॅनिटरी पॅड मुळे जे प्रदूषण होत आहे ते थांबवल्या जाईल व महिलांच्या आरोग्याची गैरसोय होणार नाही. तसेच महिलांचा आत्मसन्मान राखला जाईल असे या निवेदनामध्ये नमूद केले आहे. यावेळी उपस्थित महिला वर्ग अश्विनीताई औताडे उषा बोळे, आशा वानखेडे कल्पना अडोळे, शिल्पा वानखेडे, रेणुका राऊत, गीता राऊत ,निशा गावंडे इत्यादी महिलांची उपस्थिती
0 Comments