Ticker

6/recent/ticker-posts

रमेशभाऊ एक चालत, बोलत विचारपीठ.

उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा
महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची भूमी आहे. अशा या पवित्र भूमी मध्ये मंगरूळपीर तालुक्यातील दस्तापुर येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले रमेश  नामदेवराव मुंजे ह्या व्यक्तीमत्वा विषयी जाणून घेण्यासाठी हा लेखप्रपंच!
वडील शेतकरी गावात व गावा कसा बाहेर मानसन्मान होता त्यांना शेतीबरोबर बैलपटाचा सुद्धा छंद होता तसेच गोरगरिबाच्या हाकेला धावून जाणारे नामदेवराव यांची परिस्थिती जेमतेम होती तरी पण मनाने दानशूर असल्यामुळे, वडिलांचे कार्य  मुलगा रमेश यांनी वडिलांच्या पश्चात चालविला व आजही ते कायम आहे  पत्रकारिता व सामाजिक कार्यात अग्रेसर   असल्या मुळे  वडील ,२८ ऑगस्ट २०१६ रोजी वारल्या मुळे परिवाराची भाऊंना जबाबदारी घ्यावी लागली. ४ भाऊ व १ बहिणी सह,आई व कुटुंबाचा गाडा चालवत असताना त्यांना सर्व सुख सुविधा पुरवण्याची  मुलानं शिक्षण पूर्ण करण्याची, जबाबदारी असल्यामुळे त्यांना कमालीची कसरत करावी लागली हातात पडेल ते काम करावे लागत होते. घरात सुशिक्षित रमेश भाऊ असलेल्या  मुळे घर व परिवाराला समृद्ध करण्याचे स्वप्न अंगी बाळगून काम करित राहिले. अहोरात्र मेहनत करीत राहिले. आपले ध्येय गाठण्या साठी त्यांनी  खूप मेहनत, परिश्रम घेतले. हे सर्व करीत असताना त्यांनी परिवाराला सांभाळत असताना त्यांचे  शिक्षण  १२ वि. पर्यंत श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा खुर्द येथे झाले व कुठेतरी नोकरी लागेल यासाठी प्रयत्न केले परंतु प्रयत्न असफल झाल्यामुळे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये जाणकार मित्राच्या सानिध्यात राहून हा मार्ग स्वीकारला त्यांचे शिक्षण अपूर्ण झाले तरी ते स्पर्धेचे युगामध्ये कायम टिकून राहिले..
      भाऊंनी आपल्या जीवनाची सुरुवात पत्रकारितेच्या माध्यमातून केली आहे. अनेक वृत्तपत्रां मध्ये त्यांनी काम केलेले आहे. आणि आता स्वतःचा साप्ताहिक सुद्धा आहे.
 ते साप्ताहिक सदर  शिक्षण क्षेञात वाचक प्रीय ठरलेआहे. आज वर त्यांना मिळालेल्या   विविध सामाजिक संस्था संघटनेच्या  पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .
गोरगरिबाचे कार्य करत असताना कुठल्याही आमिषाला बळी पडतात न संकोचपणे गरीब कष्टकरी लोकांना लोक कल्याणकारी योजनेचा त्यांना कसा फायदा होईल यासाठी ते सातत्याने धडपड करत असतात राजकीय व बिगर राजकीय अधिकारी कर्मचारी यांच्या राहुन आपल्याला समाजऋण फेडावे यासाठी ते सतत गोरगरिबाचे कामे करण्यास धडपड करत असतात.  या सह विविध क्रीडा संघटनेच्या माध्यमातून  त्यांच्या  कार्याचा लेखाजोखा खूप मोठा आहे. क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण  प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.संघटनांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्हाभर अनेक क्षेत्रात कार्य केले आहे . 
संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष वाशिम तथा संपादक संघर्षाची नांदी व मंगरूळपीर प्रतिनिधी   सिटी न्यूज सुपरफास्ट व आर आर सी नेटवर्क समाज सेवा,पत्रकारिता , सत्यशोधक चळवळ, शिक्षण, क्रीडाक्षेत्र, नेहरू युवा केंद्र , प्रा. शाम मानव प्रणित अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन चळवळ, शेतकरी चळवळ , मराठा सेवा  संघटने च्या माध्यमातून  अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चाच्या माध्यमातून  गोरगरीब माणसांना न्याय मिळवून देण्याचे काम  रमेश भाऊंनी केले आहे. आज ही विविध चळवळीच्या माध्यमातून त्यांचे सातत्याने सामाजिक काम चालू असते.
     एक सामान्य पत्रकार  पर्यंत चा हा बदल त्यांना काम करण्या पासून रोखू शकला नाही. त्यांचे  भरभराटीला पावलेले सामाजिक काम एक चांगले व्यक्तिमत्व घडवत राहिले. मा जिजाऊ-शिवछञपती-शाहू-फुले-आंबेडकर यांचे  विचार जोपासना करीत कर्मयोगी गाडगे महाराज,राष्ट्र संत तुकडोजी महाराज ,  यांच्या विचाराला प्रेरणा मानून सामाजिक काम सातत्याने चालू आहे. 
पत्रकार, वक्ता, लेखक तथा शेतीची आवड जपणारा आदी अनेक भूमिकेतून त्यांचे कार्य सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने चालू आहे. 
 संवेदनशील असलेला हा माणूस माणसाला माणूस बनवण्याचे कार्य करीत आहे. त्यात तिळमाञ शंका नाही. आपल्या  सामाजिक कार्यामुळे  सर्वत्र सुपरिचीत असलेले हे व्यक्तिमत्व आहे.
       विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी ,स्थानिक सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय राहिलेआहे.पत्रकारितेचा वारसा त्यांनी आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन पुढे चालवला आहे.
 त्यांच्या स्वभाववैषिट्यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील दस्तापुर येथील अष्टपैलू व प्रभावी व्यक्तिमत्त्व ठरले आहे.अशा या अष्टपैलू व्यक्तिमत् समाजसेवक ,पत्रकार,  आदर्श व्यक्तिमत्व असलेले 'मिञसखाबंधू' रमेश भाऊ मुंजे यांना त्यांच्या आज १७ सप्टेंबर रोजी  पर्वास व त्यांच्या पत्रकारिता पेशास सार्थ  ठरविण्या-या  वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व पुढील कार्यासाठी  मनापासून हार्दिकशुभेच्छा! तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार . या मंगलमय दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. माणसाच्या या गर्दीत, अनेक चेहरे भेटतात,  काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे, आणि काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातलेच एक तुम्ही, म्हणूनच रमेश भाऊ याना सुधाकर चौधरी व वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......

Post a Comment

0 Comments