वाशिम : सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या
वाशिम जिल्हा माहेश्वरी संघटनेच्या वतीने संघटन आपल्या दारी याअंतर्गत नीट, जेईई, सीईटी परिक्षेत यश प्राप्त करणार्या समाजातील प्रतिभावंतांचा त्यांच्या निवासस्थानी जावून सन्मान चिन्ह व महेश दुप्पटा देवून सत्कार करण्यात आला. स्थानिक जानकी नगर येथे तेजस सोमाणी याने जेेईई व सिईटी परिक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलाल भुतडा, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. हरिष बाहेती, सचिव कैलास मुंदडा, उपाध्यक्ष सुनिल गट्टाणी, शैलेश सोमाणी, आर्ट ऑप लिव्हींगचे प्रशिक्षक विजय चव्हाण, सौ. भारती सोमाणी, निलेश सोमाणी, तेजस सोमाणी उपस्थित होते. निट परिक्षेत घवघवी यश संपादन करणार्या लाल बहादुर शास्त्री कॉलनी निवासी कु. मिताली विजय छापरवाल यांचाही त्यांच्या निवासस्थानी जावून सत्कार करण्यात आला. सौ. पायल छापरवाल, विजय छापरवाल, लिलाबाई छापरवाल, प्रणव छापरवाल, पलक छापरवाल, प्रीती छापरवाल उपस्थीत होते. ग्रीन पार्क कॉलनी येथे जेईई व सिईटीमध्ये उत्तुंग भरारी घेणार्या क्षितीज डाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नारायण डाळे, सौ. अर्चना डाळे, सौ. कांतादेवी डाळे, राजहंस डाळे समवेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलाल भुतडा, उपाध्यक्ष सुनिल गट्टाणी, सचिव कैलास मुंदडा व प्रचारप्रमुख निलेश सोमाणी उपस्थित होते.
0 Comments