Ticker

6/recent/ticker-posts

विठाबाई पसारकर विद्यालयात कुंभार काम कार्यशाळा,दफ्तर मुक्त शनिवार योजनेअंतर्गत अभिनव उपक्रम


 वाशिम,
:- येथून जवळच असलेल्या केकतउमरा येथील विठाबाई पसारकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथे दप्तर मुक्त शनिवार योजनेअंतर्गत 'कुंभार कला कार्यशाळा' घेण्यात आली.
आठवडाभर अभ्यास करून विद्यार्थी कंटाळतात म्हणून शनिवार हा 'दप्तर मुक्त' ठेवायचा व त्यादिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध कार्यशाळा व मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्याचे शाळेच्या प्राचार्या हर्षा पसारकर व सर्व शिक्षक वृंदांनी ठरवले . त्यानिमित्त शनिवारी ( दि १७) रोजी 'कुंभार काम कार्यशाळा घेण्यात आली‌. 
मातीच्या चाकावर कुंभार सुगडे, मडके, बोळके, माठ, धूप पात्र व पणती कशी बनवतात याचे प्रशिक्षण येथील वयोवृद्ध कलावंत सीताराम घोडे यांनी दिले. गेली अनेक वर्षे ते हा व्यवसाय करत आहेत. विविध कौशल्यावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या चाकावर व आधुनिक पद्धतीने विजेच्या चाकावर या वस्तू कशा बनवतात ही दोन्ही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. ही कला पाहून विद्यार्थी खूप आनंदी झाले अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सुद्धा काही वस्तू बनवण्याचा प्रयत्न केला. अतिशय आनंददायी पद्धतीने ही कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या हर्षा पसारकर प्रमुख पाहुणे म्हणून  सिताराम घोडे, गजानन जोशी सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अनिल थडकर, प्रशांत डोंगरे, वामन घोडे, माणिक वाकुडकर, सारंग पसारकर, संध्या मानगावकर उपस्थित होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भारती डोंगरे यांनी केले तर जयंत ठोंबरे, सुखदेव जावळे, अशोक वाठ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments