Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर शहरात सुभाष राऊत यांच्या घरी दिवसा दरोडा, 10 महिन्यापासून तपास कासव गतीने

मंगरुळपीर शहरातील बस स्टँड पाठीमागील गुरुकृपा कॉलनी येथे  मोठा दरोडा मुद्देमाल अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना १५ डिसेंबर रोजी दिवसा दपारी 12 ते 3 च्या दरम्यान घडली रहदारीच्या ठिकाणी अशी घटना घडणे म्हणजे पोलिसांना केलेले चालेंज.
सुभाष दादाराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 218 ग्रॅम सोनं व 44 हजार रुपये रोख रक्कम पोलिसात फिर्याद दिल्यानुसार  रुपये 1124100 मोठा दरोडा झाल्याची मंगरुळपीर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे .दिवसा झालेल्या दरोड्या मुळे . अशीच एक शहरात यापूर्वी कारंजा रोड परिसरातील नारायण बाहेती त्यांच्या घरी 565000  सुद्धा दिवसा चोरी झाल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती. आणि तीन दिवसांनी सुभाष राऊत यांच्या घरी दरोडा पडल्यामुळे शहरात उलटसुलट  चर्चेला उधान आले  होते.
वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. दहा महिन्यापासून दरोडेखोरांचा पत्ता न लागल्यामुळे राऊत यांनी नाराजी दर्शविली आहे. 
पोलीस प्रशासनाची चोरट्या वरील व दरोडे खोरा वरील वचक कमी झाल्यामुळे दिवसा घरफोड्या व चोऱ्या दरोड्याच्या घटना होत असल्याचे नागरिकात बोलले जात आहे. पोलिसांनी कसून चौकशी केला तर निश्चितपणे हा गुन्हा उघडकीस होण्याची शक्यताही नाकारता येत नाही कारण या पूर्वी खूप मोठ्या मोठ्या गुन्ह्याचा तपास लावून चोरट्यांना गजाआड केले आहे. वाशिम जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने अनेक मोठमोठ्या गुन्ह्याचे तपास लावले मग मंगरूळपीर शहराचे कुठे घोडे थांबले साहेब आमच्या शहराकडे थोडे लक्ष द्या  जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलीस असताना आमच्या चोरीचा  तपास न लागणे म्हणजे ही आमच्यासाठी मोठी शोकांतिका आहे .वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक बच्चन सिंग कोरोना योद्धा व चोरट्यांचे कर्दनकाळ यांनी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील चोरांच्या पायात बेड्या घातल्या साहेब तुम्हीच न्याय द्याल अशी अपेक्षा आहे. सुभाष राऊत ,नारायण बाहेती यांनी व्यक्त केली

Post a Comment

0 Comments