Ticker

6/recent/ticker-posts

८४ हजार ६११ शेतकऱ्यांनी केली पिकांची ऑनलाइन नोंद

 

वाशिम:  खरीप हंगामात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी नोंदविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या हंगामात १०० टक्के नोंदणी ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार ६२१ शेतकऱ्यांनी पिकांची नोंद मोबाइल ॲपवर केली.

महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. यंदा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला १ वर्ष पूर्ण झाले आहे. ई-पीक पाहणी मोबाइल अॅप्लिकेशनची माहिती व जनजागृती सर्व शेतकऱ्यांना व्हावी व त्यांना स्वत: शेतातील पिकाची माहिती गाव नमुना सातबारामध्ये
नोंदविण्यासाठी प्रोत्साहित
करण्याच्या हेतूने १३ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील ८०९ गावांत तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशील
शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक, संग्राम केंद्र चालकांच्या माध्यमातून ई-पीक पाहणीच्या मोहिमेच व्यापक जनजागृती केली जात आहे. १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत या कालावधीत शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोहिमेत भाग घेत आपल्या पिकांची नोंद केली तालुक्यात अधिक नोंद झाली आहे. सर्वांत कमी नोंद मानोरा तालुक्यात
वाशिम तालुक्यातील सर्वाधिक
आहे. त्याखालोखाल रिसोड 
झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक पेरा नोंद ई-पीक पाहणी अॅपमध्ये केली नाही. त्यांनी तत्काळ पिकाची नोंद करावी, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.


'माझी शेती, माझा सातबारा'

राज्य शासनाने माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा ही मोहिम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल अॅप प्रकल्पास जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची माहिती स्वतःच भरणे शक्य झाले आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक पद्धतीने आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे.

Post a Comment

0 Comments