मंगरूळपीर-येथील यशवंतराव चव्हाण कला विज्ञान महाविद्यालयात
गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन आणि पोषक आहार सप्ताह , निमित्य , फळ भाज्या व धान्याची रांगोळी, स्पर्धेचे आयोजन दिनांक 06-09-2022 मंगळवार रोजी करण्यात आले.
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटनाकरिता उद्घाटक व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर, प्रमुख अतिथी डॉ. उल्हे सर ,डॉ.खान मॅडम व समन्वयक प्रा. एस. एस.जाजू मंचकावर उपस्थित होते. मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये प्रा. जाजू यांनी पोषक आहाराचे महत्त्व विशद करताना प्रतिपादन केले की पोषक आहाराच्या सर्व घटकांविषयी जनतेमध्ये विशेषतः मातांमध्ये जागृती निर्माण करणे हे आहे तसेच डॉ .खान मॅडम यांनी उपलब्ध परिस्थितीत उत्तम पोषक आहार, कुपोषण ,रक्तशय असे आजार टाळण्यासाठी जनतेस प्रवृत्त करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले, तसेच डॉ.उल्हे सर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व सुप्त गुणांना समोर आणण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे असे प्रतिपादन केले तसेच उद्घाटक व अध्यक्ष प्राचार्य डॉ. कान्हेरकर सरांनी अभ्यास मंडळाचा रीतसर उद्घाटन झाला असे जाहीर केले व कार्यक्रमाचे कौतुक केले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतले पाहिजे तसेच पोषक आहार विषयक समस्या केवळ वैद्यकीय समस्या नसून त्या बहुअंगी आहेत असे प्रतिपादन केले.
या स्पर्धेमध्ये 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व परीक्षकाचे काम डॉ.खान मॅडम आणि डॉ. उल्हे सर यांनी पाहिले त्यात प्रथम क्रमांक सुप्रिया भगत, रोशनी चौधरी , द्वितीय क्रमांक वैशाली राठोड, साक्षी महर्षी तर तृतीय क्रमांक वैष्णवी ठाकरे, अंजली बोंबले, अर्चना पांडुळे, पल्लवी भगत यांना मिळाले तर प्रोत्साहन पर अंजली मनवर,प्रिया राऊत, ज्ञानेश्वरी सावके, कोमल जामनिक आणि नेहा राठोड यांना प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रिया राऊत यांनी मानले. कार्यक्रम संस्थेचे सचिव माननीय चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ. कान्हेरकर सरांच्या मार्गदर्शनात प्रा.सौ. एस.एस. जाजू यांनी आयोजित केले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
0 Comments