Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. हिंदी दिवसाच्या निमित्ताने भारतातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिंदी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्यामध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. श्री धानोरकर आदर्श महाविद्यालय धानोरा खुर्द येथे
 आज  हिंदी दिवसानिमित्त येथे उपस्थित आहोत. आपल्यापैकी बहुतेकांना हे देखील माहित असेल की हिंदी भाषा ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे आणि प्रत्येक भारतीयाला त्यांच्या मातृभाषेत बोलण्याचा अभिमान वाटला पाहिजे याची आठवण करून देण्यात हिंदी दिवस महत्त्वाची भूमिका बजावतो. १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला भारताची राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यात आले, तेव्हापासून हिंदी भाषेला उच्च दर्जा प्राप्त झाला आणि आम्ही दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करतो. 
हिंदी ही भारतातील सर्वात महत्त्वाची भाषा आहे. हिंदी भाषा ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात विविध भाषा बोलल्या जातात, परंतु सर्व हिंदी भाषा बोलली, लिहिली आणि वाचली जाते. हिंदी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे, जी भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून देवनागरी लिपीत लिहिली जाते. भारत हा जगातील सर्वात वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला देश आहे. धर्म, परंपरा आणि भाषेत विविधता असूनही येथील लोक एकात्मतेवर विश्वास ठेवतात. विद्यार्थ्यासह शिक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता
 मुख्याध्यापक श्री मंगेश धानोरकर , ज्येष्ठ शिक्षिका सौ जिरवणकर मॅडम ,सौ धानोरकर मॅडम,सौ होले मॅडम ,श्री पाटील सर, श्री उचित सर ,श्री ढेंगळे सर, श्री वैभव सर ,विक्रम सर, श्री सावके सर ,श्री भगत सर, व श्री झळके सर व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हिंदी दिवसाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आले.


Post a Comment

0 Comments