Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान


मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी 

आज दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर आणि मंगरूळपीर परिसरातील बस स्थानक ,अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच ग्रामीण रुग्णालय परिसर याची स्वच्छता करून
 मंगरूळपीरवासीयांना स्वच्छतेचा एक धडा शिकविला. बस स्थानकावरील परिसर विद्यार्थी स्वच्छ करीत आहेत हे पाहून बस आगारातील कर्मचारी यांनी सुद्धा स्वच्छता करायला सुरुवात केली. स्वच्छता अभियानात महाविद्यालयाचे जवळपास १२० स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता अभियान राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.चंद्रकांत उल्हे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विवेक मते सर यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments