Ticker

6/recent/ticker-posts

आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे आचार्य दायमा यांनी घेतले दर्शन धर्म, अध्यात्म, संस्कार, संस्कृतीवर झाली विशेष चर्चा

आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे आचार्य दायमा यांनी घेतले दर्शन
धर्म, अध्यात्म, संस्कार, संस्कृतीवर झाली विशेष चर्चा
वाशिम : संत शिरोमनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे 28 ऑक्टोंबर रोजी भागवताचार्य आचार्य विजयप्रकाश दायमा यांनी शिरपूर येथील निकलंक निकेतन येथे भेट घेवून श्रीफळ अर्पण करून दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी आचार्य श्री यांच्या कक्षात ऐलकश्री सिध्दांतसागरजी महाराज उपस्थीत होते. यावेळी आचार्य श्री यांच्या चरणी, आचार्य दायमा यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी, न.प. माजी सभापती राहुल तुपसांडे, रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, माजी सैनिक रामा ठेंगडे, सुनिल तापडीया, गणेश खंडाळकर, विरेंद्र बागरेचा, सिध्दार्थ भगत, सौ. वैशाली बागरेचा, जिनल बागरेचा, दर्शन बागरेचा, आरव बागरेचा, महावीर बडजात्या, संस्कार बडजात्या यांनी आचार्य श्रही यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी आचार्य दायमा यांना महाकाव्य मुकमाटी, दिगंबरत्व व दिगंबर मुनी व उर्ध्वरेता तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांना स्वत: आचार्य श्री यांनी महाकाव्य मुकमाटी हे पुस्तक आशीर्वादरूपी प्रदान केले. यावेळी आचार्य विद्यसागरजी महाराज व आचार्य दायमा यांच्यामध्ये धर्म,अध्यात्म, संस्कार संस्कृतीवर विशेष चर्चा, विविधी दाखले व उदाहरणासह झाली. यावेळी आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज यांनी कुंडलीनी योग बाबत विशेष चर्चा केली. पुरूष व महिलांमध्ये काही बाबतीत असलेले अंतर याबाबतही चर्चा यावेळी झाली. कुंडलीनी योग जागृत करण्याची शक्ती संत, तपस्वी व आपणामध्ये असल्याचे आचार्य दायमा यांनी आचार्य श्री यांना सांगीतले. भागवतामधील काही दाखले देवून त्यांनी वेगवेगळया विषयावर मंथन केले. ऐलक सिध्दांतसागरजी महाराज यांनीही अनेक दाखल्यासह विविध विषयावर प्रकाश टाकला. आचार्य श्री यांचे मुकमाटी हे महाकाव्य विश्वप्रसिध्द असल्याचे सांगीतले. भागवत व रामकथेच्या माध्यमातून काही विषय घेवून प्रबोधन करण्याची आचार्य दायमा यांना आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी केली. यावेळी निलेश सोमाणी यांनी आचार्य दायमा हे गत चाळीस वर्षापासून देश-विदेशात श्रीमद भागवतकथा, रामकथेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचे सतत आयोजन करीत असल्याची माहिती आचार्य श्री यांना दिली. यावेळी चार्तुमास समितीच्या वतीने प्रवक्ता डॉ. अभयकुमार गुंगे, मंत्री प्रकाश महाजन यांनी आचार्य दायमा, तुपसांडे, वानखडे यांना आचार्य श्री यांची प्रतिमा , सन्मानचिन्ह व मोतीची माळ देवून सन्मानित केले. सोबतच मंदीर समितीच्या वतीने रामा पंचभाई यांनी आचार्य दायमा यांचा सत्कार केला. ऐलकश्री सिध्दांतसागरजी महाराज यांच्या कक्षातही विविध विषयावर मंथन झाले. जवळपास आचार्य श्री यांच्या कक्षात एक तास दोन संतांचे मिलन होवून धर्म, अध्यात्म व संस्कार व संस्कृतीवर प्रकाश टाकण्यात आला.  

Post a Comment

0 Comments