Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम कुस्ती स्पर्धेत पुरुषांसह महिला पैलवानांनी गाजवले मैदान

कुस्ती स्पर्धेत पुरुषांसह महिला पैलवानांनी गाजवले मैदान
ज्ञानेश्वर गादेकर १ लाखाच्या प्रथम क्रमांकाच्या बक्षीसाचे मानकरी
महाराष्ट्र कुस्तीगीर क्रीडा मंडळाचे आयोजन
वाशीम - श्री बालासाहेब यात्रा व मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. बबनराव भालेराव यांच्या स्मृतीनिमित्त महाराष्ट्र कुस्तीगीर क्रीडा मंडळाच्या वतीने गुरुवार, २७ ऑक्टोंंबर स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल मैदानात कुस्त्याचे आम दंगल भरवण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले, ठाणेदार रफीक शेख, पीएसआय धनराज तायडे, एसआय गणेश सरनाईक, हवालदार सखाराम वंजारे, लालमणी श्रीवास्तव, अमोल इरतकर, जमादार विजय घुगे, अनिल केंदळे, बाळु मुठाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, विशाल बळी, विवेक पाटणी, नितेश मलीक, नागोराव ठेंगडे, कैलास गोरे, राहुल तुपसांडे, नितीन उलेमाले, पंकज उलेमाले, राजुभाऊ वानखेडे, बालगोपाल तालीमचे अध्यक्ष सतिश वानखेडे आदींची उपस्थिती होती.
  या भव्य कुस्ती दंगलमध्ये पहील्या क्रमांकाकरीता एक किलो चांदीची गदा स्वर्गीय बबनराव गोविंदराव भालेराव मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालेराव परिवाराच्या वतीने ठेवण्यात आली होती. पहिले बक्षीस १०१००० शेतकरी संघर्ष संघटनेचे राजुभाऊ वानखडे व भाजपाचे राजु पाटील राजे यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. व्दितीय बक्षीस माजी शिवसेना शहरप्रमुख नागोराव ठेंगडे व शिवशंकर गणेशोत्सव मंडळाचे अनंता रंगभाळ यांच्या वतीने ७१ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५१ हजार रुपये स्वर्गीय हरिभाऊ भगाजी इंगळे यांच्या स्मरणार्थ बबन इंगळे सचिव कृऊबा समिती वाशिम यांच्यावतीने, चौथे बक्षीस ३१ हजार मंत्री चॅरिटेबल ट्रस्ट स्वर्गीय गोविंदरावजी चौकालालजी मंत्री स्मृती प्रित्यर्थ, पाचवे बक्षीस २१ हजार रुपये स्वर्गीय छायाबाई अशोक परभणी यांच्या स्मरणार्थ चिकू परभणी व गणेशराव भांदुर्गे यांच्या वतीने, सहावे बक्षीस ११ हजार रुपये पंकज व नितीन उलेमाले यांच्या वतीने, सातवे बक्षीस ७ हजार रुपये राजू रंगभाळ यांच्याकडून, आठवे बक्षीस ५ हजार रुपये संतोष शिंदे यांच्याकडून, नववे बक्षीस ३ हजार रुपये दत्ताभाऊ वानखेडे यांच्या वतीने, दहावे बक्षीस २१०० रुपये स्व. पांडुरंग इरतकर यांच्या स्मरणार्थ किसन इरतकर यांच्या वतीने ठेवण्यात आले होते.
  कुस्ती स्पर्धेत बजरंगबली आखाडयाचे पहेलवान व स्व. बबनराव भालेराव यांचे शिष्य ज्ञानेश्वर गादेकर हे पंढरपूरचे धनाजी कोळी यांना पराभूत करून पहिल्या बक्षीसाचे मानकरी ठरले. दुसरे बक्षीस दिगंबर भुतनर हिंगोली, तिसरे बक्षीस जमीर मुलांनी कुर्डूवाडी, चवथे बक्षीस लक्ष्मण इंगोले वाशिम, पाचवे बक्षीस विजय वारा, सहावे बक्षीस मेहबूब बेनीवाले, सातवे बक्षीस अंकुश वाशिम, आठवे बक्षीस करण वाशिम व अभिषेक जयपूर यांची बरोबरीत कुस्ती झाली. नव्या कुस्तीचा मानकरी विनोद वाशिम आणि दहाव्या बक्षीसाचे गणेश आणि विजय यांची बरोबरीत कुस्ती झाली. एकूण दहा क्रमांकामध्ये विविध पैलवानांनी काट्यावरची लढत करून कुस्त्याचे मैदान गाजवले. या कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन बबन भालेराव, उपाध्यक्ष गजानन नागोराव ठेंगडे, मनोज बाळाभाऊ शेळके, सचिव गणेश गाभणे, सहसचिव अशोक भालेराव, कोषाध्यक्ष संग्राम ठाकूर, सहकोषाध्यक्ष उमेश इंगोले, संघटक अमर जाधव, सहसंघटक सुधीर इंगोले, सदस्य ज्ञानेश्वर गादेकर, पवन जैरव, रामा काळबांडे, विनीत बोने, गौरव तुपसांडे, जमीर पैलवान, उमेश कथले, चेतन रंगभाळ, अक्षय गिरी, देवा वानखेडे, गणेश सावळकर, सुंदर डोंगरदिवे, पप्पू व्यवहारे, सतीश खंडारे, अजय रणखांब, देवा सारसकर, कुस्त्याचे पंच म्हणून पुरुषोत्तम तुपसांडे, अशोक भालेराव, चंदन मालस, बि.एन. बोने, विठ्ठलराव इंगोले, श्रीराम ढवळे, रामभाऊ डाेंगरदिवे, विश्वनाथ जोगदंड, बाबुलाल साबळे, शिवाजी इंगळे, शंकर गोरे, मुलचंद अहिर यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेत महिला कुस्तीपटुंनी सुद्धा हजेरी लावली होती. यातील अनुष्का गादेकर या महिला पहेलवानाने गोल्ड मेडल मिळवून देशासह गादेकर परिवाराचे नावलौकीक केले आहे. स्पर्धेदरम्यान गजानन जोगदंड यांनी रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली.

Post a Comment

0 Comments