दिवाळीच्या काळात सुट्या उपभोगण्याकरिता घराला कुलूप लावून फिरायला जाणाऱ्यांवर नजर ठेवून चोरटे त्यांचा डाव साधतात. असे अनेक प्रकार यंदाच्या दिवाळीतही घडले. याप्रकरणी अनेकांनी पोलिसांत धाव घेऊनही काही फायदा झाला नाही. चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागत आहे. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या
यंदा शुक्रवार, २१ ऑक्टोबरपासून दिवाळीला धुमधडाक्यात सुरूवात झाली. २२ ची धनत्रयोदशी, २४ ला लक्ष्मीपुजन आणि २६ ला भाऊबिजेचा सण होता. या सर्व सुट्यांमुळे अनेकांनी आपल्या मूळ गावी; तर बहुतांश जणांनी बाहेरगावी फिरायला जाण्याचा बेत आखला. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी डाव साधत घराच्या कपातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना यंदाच्या दिवाळी काळातही घडल्या आहेत.
घराला लावलेले कुलूप तोडून, घरावरील टिन पत्रे वाकवून, दुकानाचे शटर तोडून चोरटे त्यांचे मनसुबे यशस्वी करतात. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी घर दुकानाभोवती सीसीटिव्ही कॅमेरे, लावण्यासह चांगल्या दर्जाचे कुलूप असावे, असे पोलिसांचे मत आहे आहे . आपण जर काळजी घेतली तर नक्कीच पोलीस प्रशासनावरील तान कमी होऊ शकतो प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन मदतीसाठी धावून येत असते.




0 Comments