Ticker

6/recent/ticker-posts

पदवीधर मतदार नोंदणीचा कालावधी 31 डिसेंबर पर्यंत वाढवा :तेजराव वानखेडे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

वाशिम : पदवीधर मतदार नोंदणीचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी  रिपाइं आठवले  चे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.
त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  परंतू अमरावती विभाग हा मोठा मतदार संघ असल्याने 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर हा कालावधी अपुरा पडत असल्याने नवीन पदवीधर मतदारांची नोंदणी होणे शक्य नसून मतदार नोंदणीचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावा जेणेकरुन पदवीधर मतदार मतदानापासून वंचीत राहणार नाहीत. व आपल्या समस्या सोडविण्यासाठी पदवीधरांचा हक्काचा उमेदवार निवडता येईल.
सदर निवेदन देताना जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जेष्ठ साहित्यीक महेंद्र ताजणे, माजी सैनिक तथा जेष्ठ नेते सिध्दार्थ भगत, सिध्दार्थ पाटील, प्रकाश गवई, हिरामण साबळे, तुकाराम खडसे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments