मंगरूळपिर, एस पि चव्हाण
अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा समाज कुंभ मेळावा होत असून या संदर्भामध्ये संपूर्ण समाज माध्यमातून अनेक सकारात्मक नकारात्मक चर्चा सुरू आहेत. लोकांमध्ये संभ्रम आहे व यासाठी गोरबंजारा धर्मपिठावरून गोर बंजारा समाजाचे मुख्य केंद्र असलेल्या पोहरागड येथील साधुसंत महंतांना सातत्याने देशभरातून विचारना होत आहे . या संदर्भामध्ये सदर कार्यक्रमासाठी पोहरागड येथे आयोजकांनी एक प्राथमिक नियोजन बैठक घेऊन यामध्ये चर्चा करताना सूचना केल्या होत्या. त्यांचा अंमल होणे अपेक्षित आहे अखंड हिंदुस्थानातील गोरबंजारा समाज अखंड हिंदुस्थानाचा प्रमुख घटक असून हिंदूराष्ट्रासाठी आग्रह आहे भारतभर विखुरलेला गोर बंजारा समाज इतिहास परंपरा धर्म व संस्कृती संवर्धन व संगोपन करून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वागत आहे . गोद्री येथे दि. २५/ १/२०२३ ते ३०/१/ २०२३ जानेवारी या कालखंडात होणारा अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लंबाणा नायकडा समाज कुंभ मेळावा यशस्वी होण्यासाठी गोरबंजारा धर्मपिठ पोहरागडच्या व उमरी गडाच्या महंताकडून पुन्हा एकदा सूचना करण्यात येत आहे. गोद्री येथील कार्यक्रमाचे आयोजकांना धर्मपिठच्या महतांनी केलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे . व कार्यक्रमाची रूपरेषा महंतासमोर स्पष्ट सादरीकरण करून महंताच्या मान्यतेने अंतिम स्वरूप द्यावे ही अपेक्षा आहे. दि. २५/१/२०२३ पासून सुरू होणाऱ्या कुंभ मेळाव्याचे प्रतीक म्हणून गोरबंजारा समाजाच्या पांढऱ्या झेंड्याला महत्त्व द्यावे . गोरबंजारा समाजाचा कुंभ मेळावा असल्याने पांढरा झेंड्याचा ध्वजारोहण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा . सभागृहातील प्रवेशद्वार व इतर मुख्य कमानी यांना संत सेवालाल महाराज .संत रामराव महाराज. संत लक्ष्मण चैतन्य बापूजी व इतर महान साधुसंतांची नावे द्यावीत या कार्यक्रमांमध्ये केंद्रस्थानी गोरपिठाधिश्वर प.पू. बाबूसिंग महाराज यांना सन्मानाने अध्यक्ष स्थान द्यावेत .सोबत महंत रामसिंग महाराज महंत गोपाळजी चैतन्य महाराज महंत कबीरदास महाराज महंत सुनील महाराज महंत जितेंद्र महाराज महंत यशवंत महाराज महंत शेखर महाराज व इतर सर्व साधुसंतांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करावा. या बंजारा मेळाव्यात देशभरातून बंजारा समाज येणार असल्याने बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्र विषयी व तत्वज्ञान विषयी दि. २५ ते ३० या कार्यक्रमांमध्ये रोज संत सेवालाल महाराज जीवन चरित्रावर प्रबोधन व्हावे व गोरबंजारा साधु संत महापुरुष विचाराचे प्रबोधन व्हावे. या मेळाव्यामध्ये बंजारा समाजाचे धर्मगुरू असलेले संत रामराव बापू यांच्या मनातील समाजासाठी स्वप्न पूर्णतत्त्वास आणण्यासाठी काही ठराव करण्यात यावे आणि राज्य व केंद्र शासनाकडे पाठवण्यात येऊन पाठपुरावा संपूर्ण भारतामध्ये विखुरलेला गोरबंजारा समाज एका सूचीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे. संपूर्ण भारतामध्ये एकच बोलीभाषा बोलत असलेल्या गोरबोली भाषेला संविधानिक दर्जा मिळवणे करिता प्रयत्न करावे . प.पू. संत रामराव बापू यांची देशभरातील कार्याची दखल घेऊन प.पू. रामराव बापूंना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. गोरबंजारा समाजाच्या संस्कृती संवर्धनासाठी प्रत्येक राज्यामध्ये व प्रमुख शहर नगरामध्ये गोर बंजारा भवन उभारण्यात यावे . गोरबंजारा समाजातील देशभरातील तीर्थक्षेत्र यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याचा विकास करण्यात यावा . शासनाकडून भरून निधी मिळावी गोरबंजारा समाजाच्या विकासासाठी ज्या समाजामध्ये तांड्याची संख्या अधिक आहे त्या समाजामध्ये कर्नाटक राज्याच्या धरतीवर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे त्याला भरीव निधी व अध्यक्षला मंत्रीपदाचा दर्जा देण्यात यावा.
नॉन क्रिमिनल ची अट रद्द करावी. वरील सूचना व ठराव आतील मुद्दे या भव्य कार्यक्रमासाठी आयोजकांनी विचारात घ्यावेत या सर्व बाबत सुस्पष्ट सदरीकरण धर्मपीठ मंहता समोर केल्यानंतर समाजासाठी अंतिम प्रसिद्धी पत्रक जाहीर केले जाईल व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व दूर संपन्न सहकार्य अपेक्षित आहे असे गोर धर्मपिठ भक्तीधाम चे महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले आहे.
0 Comments