मंगरूळपीर ता प्र धानोरा खुर्द ते कुंभी रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे
या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था निर्माण झाली होती या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या भागातील जागरूक नागरिकांनी यापूर्वी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्ता दुरुस्तीसाठी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू केले होते परंतु दुरुस्तीचे काम फाळेगाव ते शिवनी द पर्यंत ठेकेदारांनी बोगस केल्यामुळे या भागातील नागरिक आक्रमक झाले होते त्यानंतर ठेकेदारांनी अर्धवट काम सोडून पोबारा केला पुन्हा ठेकेदारांनी गेल्या पंधरा दिवसात शिवनी द ते कुंभी पर्यंत खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले होत खड्डेे दुरुस्तीचे काम करताना ठेकेदारांनी डांबराचा अल्प प्रमाणात वापर करून खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले त्या खड्ड्यावर बारीक गिट्टीचा जास्त वापर करत असल्यामुळे व त्यावर डांबर नसल्यामुळे त्या बारीक गिट्टीवरून दुचाकी वाहन धारकाचा अनेक वेळा अपघात झाले आहेत पुन्हा ठेकेदारांनी बोगस काम करण्याची सुरू केले त्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मंगरूळपीर यांना रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यात असे नमूद केले आहे की या रस्त्यावरील खड्ड्याच्या दुरुस्तीची काम न करता या भागातील शिवनी द नांदगाव पिंपळगाव आसेगाव पिंपळगाव कुंभी लही येथील नागरिकाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरणाचे काम करण्यासाठी निवेदन दिले
या भागातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले त्याची वरिष्ठांनी दखल घेऊन संबंधित आंदोलन कर्त्यांना मंगरूळपीर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कनिष्ठ अभियंता जोजरे व वाडेकर
यांनी आंदोलन कर्त्याची भेट घेऊन आंदोलकांना त्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम प्रशासनाकडून मंजूर झाल्याचे पत्र दाखविले तसेच या भागातील नागरिकाचा कायमचा खड्डे मुक्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी एका महिन्याच्या आत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले हे आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले त्या रस्ता रोको आंदोलनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त म्हणून ठाणेदार सागर दानडे व इतर पोलीस कर्मचारी हजर होते या रास्ता रोको आंदोलनामध्ये या भागातील नागरिक दाऊद खान डॉक्टर भगवान भेंडेकर माजी सरपंच सुभाष कावरे माजी सरपंच विष्णू फड मुख्तार सागर उत्तम कुटे शाकीर शेख संदीप पुंडलिकराव ठाकरे रमेश मुंजे विजय पुंडलिकराव ठाकरे अनिल पोटकटारे गोविंदा चौधरी तातेराव भेंडेकर शेख रहीम शेख मुसा जावेद पटेल भास्कर दिनकर भेंडेकर रामेश्वर ठाकरेअकबर पटेल मुफिद केशव चौधरी इतर नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता
0 Comments