Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यात प्रथमच 'अमरावती परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा २०२२' चे आयोजकपद.

अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२२ या दि.२५.११.२०२२ ते २९.११.२०२२ दरम्यान नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथील कवायत मैदानावर आयोजित असून जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच हा बहुमान वाशिम जिल्हा पोलीस दलास प्राप्त झाला आहे. ०५ दिवस चालणान्या या पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण ०६ जिल्ह्यातील खेळाडू पोलीस अधिकारी/अंमलदार सहभाग घेणार आहेत.
दि. २५.११.२०२२ ते २९.११.२०२२ चालणाऱ्या या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावती परिक्षेत्रातील अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा या ०६ जिल्ह्यांमधील foo • पेक्षा जास्त खेळाडू पोलीस अधिकारी / अंमलदार स्पर्धेत उतरून आपल्यातील क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत. सदर स्पर्धेदरम्यान एकूण ३३ वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत. स्पर्धेदरम्यान वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकरणामध्ये प्रथम क्रमांकास सुवर्ण पदक, द्वितीय क्रमांकास रजत पदक व तृतीय क्रमांकास कांस्य पदक प्रदान केले जाणार आहेत. त्यावरून प्रत्येक जिल्हा घटक संघास गुण दिले जाणार असून स्पर्धेच्या शेवटी गुणानुक्रमे अव्वल येणा-या संघास जनरल चॅम्पीयनशिप' दिमाखदार बक्षीस समारंभात प्रदान केली जाणार आहे. स्पर्धेकरिता येणाऱ्या सर्व खेळाडू पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था सर्व सोयीसुविधायुक्त अश्या नवीन पोलीस मुख्यालयात करण्यात आली असून त्याच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. अश्याचप्रकारे संपूर्ण क्रीडा स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळ्या समितीची स्थापना करण्यात आली असून त्यावर अनुभवी पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणूक करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
सदर अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२२ या नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथील मैदानावर तसेच जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथील इनडोअर हॉल येथे पार पडणार असून त्यासाठी मैदान सुसज्ज करण्यात आले आहेत. नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथील कवायत मैदानावर अल्प कालावधीत उच्च प्रतीचे मैदान तयार करण्यात आले आहेत. 'अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१२ च्या यशस्वितेसाठी मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सर्व समिती प्रमुख पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, वाशिम,
सर्व कवायत निर्देशक व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मेहनत घेत आहेत.

Post a Comment

0 Comments