Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कला विज्ञान महाविद्यालय मध्ये शैक्षणिक सहल संपन्न--

मंगरूळपीर--श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा  द्वारा संचालित स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत एकदिवसीय शैक्षणिक सहल *श्रीनाथ दाल मिल, एमआयडीसी अमरावती व कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ मालखेड तलाव चांदुर रेल्वे* येथे दिनांक-18/11/2022 शुक्रवार रोजी संपन्न झाली.
या भेटी दरम्यान श्रीनाथ दाल मिलचे मालक श्री. अखिलेश भैय्या यांनी दाल मिलमध्ये तूर पासून ते डाळ बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष  पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थिनींनी व मॅडमनी सर्व प्रक्रिया प्रश्न उत्तराच्या माध्यमातून माहिती गोळा केली .सोबतच पॅकिंग, मार्केटिंग, पॉलिश करणे, डाळ वाळविने ड्रायर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व  विद्यार्थिनींनी पॅकिंग सुद्धा करून बघितली.आभार प्रदर्शन राणी जामनिके यांनी मानले.
त्यानंतर कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ मालखेड तलाव चांदुर रेल्वे येथे पर्यावरण पूरक शैक्षणिक सहलीचा आनंद लुटण्यात आला .या ठिकाणी वॉटर पार्क, स्विमिंग पूल, ट्रेन ,मोटर बोटिंग, थ्रीडी पिक्चर इत्यादी तसेच विविध झोपाळे यांचा आनंद घेण्यात आला. या वेळेस अभ्यास मंडळाचे उपाध्यक्ष ललिता निंबेकर, कोषाध्यक्ष ईश्वरी चौधरी, सह सल्लागार प्रिया राऊत, तसेच वैष्णवी राऊत ,साक्षी भगत, वैष्णवी ठाकरे, सानिका आखाडे, प्रज्ञा चुंबळे, रोशनी चौधरी, राणी जामनिके ,अंजली बोंबले ,सुप्रिया भगत, अंजली मनवर, पूजा सोळंके इत्यादी विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच ग्रुप लीडर म्हणून सानिका आखाडे यांनी काम बघितले. या सर्व विद्यार्थ्यांनी ने या सहलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या शैक्षणिक सहलीमध्ये सर्व विद्यार्थिनींनी  संपूर्ण सहकार्य दिला.
शैक्षणिक सहल श्री चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन, प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात, गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा.सौ. एस. एस. जाजू  यांनी सहलीचे आयोजन केले या शैक्षणिक सहली मध्ये एकूण 14 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व सदर शैक्षणिक सहल यशस्वीरित्या संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments