विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर या संस्थेच्या ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या मतदानानंतर ७ नोव्हेंबर निकाल जाहीर झाला. विदर्भातील खरेदी- विक्री संघ प्रतिनिधी मतदारसंघातून वाशिम जिल्हा प्रवर्गातून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचा दणदणीत विजय होऊन त्यांची संचालकपदी निवड झाली आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यातून या मतदारसंघांमध्ये एकूण ८३ मतांपैकी त्यांना ७८ मते मिळाली. विरोधी उमेदवार मोतीराम ठाकरे यांनी त्यांना यापूर्वीच आपला पाठिंबा घोषित केला होता. परंतु, मोतीराम ठाकरे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत आपली उमेदवारी मागे न घेऊ शकल्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार
पडली. सोमवारी मतमोजणी प्रक्रिया नागपूर येथे पार पडली असता वाशिम जिल्ह्यातून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांची या संस्थेवर वर्णी लागली आहे. यामुळे सहकार क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या या संस्थे संस्थेच्या संचालक पदी ठाकरे यांची निवड झाल्यामुळे वाशिम जिल्ह्याला या संधीचा चांगल्या प्रकारे फायदा मिळणार आहे. या निवडणूकीत सुभाषराव ठाकरे बहुमताने विजयी झाल्याचे वृत्त जिल्ह्यात धडकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व हितचिंतकांनी आतिश बाजी सह जल्लोष केला. कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेना असे चित्र पाहावयास मिळाले वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ ,महाराष्ट्रात राजकारणाची छबी निर्माण करणारे साहेबांच्या हाकेला लाखो कार्यकर्ते आजही उभे राहतात ठाकरे साहेबांचा चहाचा वर्ग असल्यामुळे साहेबांचा दणदणीत विजय झाला आहे.
0 Comments