वाशिम जिल्हा राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष ज्योती ठाकरे
शिवसेना' पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत.
वाशिम जिल्हा राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष ज्योती ठाकरे म्हणाल्या? राजकारणातील स्त्रियांबद्दल अशोभनीय, घाणेरडी भाषा वापरण्याची नवीन फॅशन महाराष्ट्रात आली आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. राजकारणातील स्त्रिया हा अपमान खपवून घेणार नाहीत. सत्तार यांनी तत्काळ माफी मागावी,
सत्तारांनी सुप्रियाताई सुळेंची माफी मागावी. अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा अल्टिमेटम काल राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला होता. तर सत्तारांच्या माफीने काम भागणार नाही, राजीनामा द्या अशी आक्रमक मागणी वाशिम जिल्ह्याच्या ज्योती ठाकरे महिला कार्याध्यक्ष यांनी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर सत्तारांचा निषेध करत जोडे मारो पुतळा दहन आंदोलन केले.
0 Comments