Ticker

6/recent/ticker-posts

विश्व हिंदु परिषदेच्या हितचिंतक अभियानाला मंगरूळनाथ येथे सुरुवात

विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभर दि.6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान हितचिंतक अभियान राबविल्या जाणार आहे अभियानाचा एक भाग म्हणून मंगरूळनाथ येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभियानाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अमित चव्हाण,ॲड.आशिष नेने,जिल्हामंत्री सतीश हिवरकर प्रा.वीरेंद्रसिंह ठाकूर ,सुनील मालपाणी ,शाम खोडे, सचिन परळीकर,प्रमोद घोडचर,देवानंद राठोड,मुकुंद दंडे,संतोष आवटे तसेच तसेच नगरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील दिड लाख गावांमध्ये एक कोटी हुन जास्त हितचिंतक सदस्य करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेचे अंतरराष्ट्रीय महामंत्री आदरणीय श्री.मिलिंदजी परांडे यांनी व्यक्त केला आहे. वाशिम जिल्ह्यात जास्तीत जास्त (सदस्य)हितचिंतक नोंदणी करून हिंदू समाज संघटित करण्याचा मानस जिल्हा जिल्हामंत्री सतीश हिवरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
धर्मांतरण, लव्हजिहाद,गोवंश हत्या अशा अनेक विषयांवर विश्व हिंदू परिषद लक्षवेधून त्याबाबत जनजागरण करणार असून हिंदू समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांची सदस्य नोंदणी करून त्यांना विश्व हिंदू परिषदेशी जोडण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावे.
तीन वर्षातून एकदा होणाऱ्या ह्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वेळ देऊन अभियानाला यशस्वी करावे असे विचार जिल्हाध्यक्ष डॉ.अमित चव्हाण यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या नगर तथा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले

Post a Comment

0 Comments