Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन शिरपुर व पोलीस स्टेशन मेहकर जि. बुलडाणा पोलीसांची सयुक्त कामगीरी, ०२ आरोपीसह ०७ मोटार सायकल जप्त.


पोलीस स्टेशन मेहकर जि बुलडाणा येथील गुन्हा रजि.क ३५३ / २०२२ कलम ३७९ भादंवि व ३५४ / २०२२ कलम ३७९ भादंवि चे गुन्हयात आरोपी शोध कामी व तपास कामी पोउपनि रवि मारे व पोशि/ २१७८ मोहमद परसुवाले पोस्टे मेहकर येथुन तपास पथक पोस्टे शिरपुर येथे हजर झाले वरून मा. श्री बच्चन सिंग पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम, मा. गोरख भामरे अप्पर पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम व मा. सुनिलकुमार पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, वाशिम यांचे आदेशाने व मार्गदर्शना नुसार पोस्टे शिरपुर येथुन तपास मदत करीता बिट अंमलदार नापोशि/ ११२३ श्रीकृष्ण नागरे व पोशि/ ९३६ विनोद घनवट असे ग्राम पांगरखेडा येथे जावुन संशयीत आरोपी नामे रंधवा पवार व सुरज रंधवा पवार रा. पांगरखेडा यांना ताब्यात घेवुन पोस्टे मेहकर येथे जावुन चौकशी केली असता सुरज रंधवा पवार याने राहुल गंगाराम पवार + ०२ आरोपीचा सहभाग असले बाबत सांगीतले,
त्यावरून रात्री दरम्याण पोस्टे मेहकर येथुन पोउपनि धुले, पोउपनि रवि मोरे सोबत पोहवा / १६३९ नापोशि/ ११५९ पोशि/ २४९६, २३८० २१७८, २१९६ असे पुढील तपास कामी पोस्टे शिरपुर येथे हजर आले, त्यांनी पोलीस मदतीची मागणी केली वरून पोस्टे शिरपुर येथील पोउपनि साठे, सपोउपनि / ५२४ प्रकाश सरनाईक, नापोशि/ ११२३ श्रीकृष्ण नागरे, पोशि/८५२ प्रविण शेंद्रे, पोशि/ ५०३ प्रविण गोपनारायण, पोशि/ ९३६ विनोद घनवट पोशि/ १३९ विनोद जायभाये चालक पोहवा / ७७१ विलास पवार सरकारी वाहनाने ग्राम चांडस येथुन ०१ आरोपी व शिरपुर येथुन ०१ आरोपी ताब्यात घेवुन त्यांना तपासासंबधाने विचारपुस केली असता नमुद आरोपीतांकडुन ०७ मोटार सायकल व आरोपी पोस्टे मेहकर जि बुलडाणा पोलीसांनी ताब्यात घेवुन पुढील तपास कामी घेवुन गेले.
पोलीस स्टेशन शिरपुर हददीत चोरीच्या घटने बाबत काही माहिती असल्यास पोलीस स्टेशन शिरपुर हे सजग व तत्पर असून सदर घटनेची गांभी याने दखल घेवुन गुन्हेगांराविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. माहिती देणा-याचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन मा. श्री बच्चन सिंग, पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम यांनी जिल्हयातील सर्व नागरीकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments