वाशिम जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) निवडणूक होऊ घातल्याने जिल्हा परिषदेत मोर्चेबांधणीला पुन्हा वेग येत आहे. ७ नोव्हेंबरला मतदारयादी अंतिम झाल्याने आता निवडणुकीची तारीख निश्चित केव्हा होणार? याकडे लक्ष लागले आहे. वाशिम : जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीतील जिल्हा नियोजन समितीच्या
माध्यमातून जिल्हा विकासाच्या आराखड्याला योग्य दिशा देण्याचे काम केले जाते. २० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात एकूण सदस्यसंख्या ३० असून, त्यापैकी २४ सदस्य निवडून द्यावयाचे असतात. हे २४ सदस्य जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र व नागरी क्षेत्राची लोकसंख्या यांच्यामधील गुणोत्तराच्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या व नगर पंचायती, नगर परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधून निवडून द्यावयाचे असतात. जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त १४ सदस्यांची जिल्हा परिषद सदस्यांमधून निवड करण्यासाठी मागील पावणेतीन वर्षात निवडणूक झाली नाही. जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. तेव्हापासून जिल्हा परिषद सदस्यांना डीपीसी निवडणुकीची प्रतीक्षा लागली आहे. अखेर पावणेतीन वर्षांनंतर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा मुहूर्त मिळाला. २ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूपरीत्या प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अथवा कोणत्याही नोंदीतील तपशिलाबद्दल आक्षेप घेण्यासाठी ४ नोव्हेंबर, अशी अंतिम मुदत होती. प्राप्त आक्षेपांचा निपटारा करून ७ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा परिषदेत एकूण ५२ सदस्य असून, यामधून जवळपास १४ सदस्य जिल्हा नियोजन समितीत निवडणुकीच्या माध्यमातून पाठवावयाचे आहेत. अंतिम मतदार यादी झळकल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
जिल्हा परिषद निवडणूक होऊन पावणे तीन वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. आता केवळ सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळ शिल्लक आहे. आता जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्यांना केवळ सव्वा दोन वर्षेच जिल्हा नियोजन समितीत सदस्य म्हणून राहता येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीस विलंब होत असल्याने मध्यंतरी काही सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात प्रश्नही उपस्थित केला होता.
0 Comments