वाशिम: अन्न व औषध प्रशासन, म.रा अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रिसोड शहरात धाड टाकून प्रतिवचित अन्नपदार्थाचा साडेपाच लाखांचा साठा जप्त केला. ही कारवाई २३ नोव्हेंबरला करण्यात आली. या प्रकरणी आरोपीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन म रा अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिटी यांनी विजय
भोंदुराम सापडिया यांचे राहते घरी रामनगर, लोणी फाटाजवळ, रिसोड, जिवाशिम) या ठिकाणी धाड टाकून प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू या पदार्थाचा एकूण ५ लाख ४९ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला. प्रकरणी प्रशासनातर्फे सिद्दीकी यांच्या फिर्यादीवरून विजय भौदुराम तापडिया याच्यावर पोलिस ठाणे
रिसोड येथे जन सुरक्षा व मानदे कायदा कलम ४२ व भादंवि कलम ३२८८ १८८ [व] २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी पुढील तपास पो.स्टे रिसोडचे अधिकारी करत आहेत. ही कारवाई सहआयुक्त शरद कोलते व सहायक आयुक्त सागर तैरकर व पो.स्टे रिसोडचे पोलिस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी, अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) संदीप सूर्यवंशी, पो.स्टे रिसोडचे हेड कॉस्टेबल प्रदीप चव्हाण व महिला पोलिस कर्मचारी आरती काळे यांच्या पथकाने केली
0 Comments