अवैध धंदे करणाऱ्यांना सूट शेतकऱ्याकडून वसुली
वाहतूक विषयक नियम तोडणारे वाहनचालक सोडून दुचाकी वाहनाद्वारे शेतात ये-जा करणाऱ्या शेतक
ऱ्यांवरच पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी शिरपूरचे शेतकरी दत्ता प्रल्हाद वाघमारे यांनी २४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन चुकीच्या पद्धतीने कारवाया करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद आहे की, केवळ वरिष्ठांकडून कारवायांचे मिळालेले, टार्गेट पूर्ण करण्यासाठी शिरपूर मालेगाव रस्त्यावर वाहतुकीची विशेष
वर्दळ नसतानाही पोलिसांनी
कारवायांचे सत्र सुरू केले आहे, विशेषतः शेतकऱ्यांची वाहने थांबवून हेल्मेट का लावले नाही, जवळ परवाना आहे का, अशी विचारणा केली जात आहे. या माध्यमातून दंड वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली असून शेतातून दूध, भाजीपाला, गुरांना चारा आणण्याचे काम प्रभावित होत आहे.थांबविण्याची मागणी तक्रारीतून
तक्रार करताना केली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी अशा बाबीकडे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली आहे.
0 Comments