Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर येथे संभाजी ब्रिगेडची बैठक उत्साहात संपन्न


मंगरुळपीर (दि.४): वैचारिक तरुणांचे बलशाली संघटन अशी ओळख असलेल्या संभाजी ब्रिगेडची मंगरुळपीर येथील विश्रामगृह येथे दिनांक ४ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली.या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजाननदादा भोयर, जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना भवानीवाले, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संभाजी ब्रिगेड पक्षात अनेक युवकांनी प्रवेश केला. व त्यातील काही युवकांच्या तालुका कार्यकारणीत नियुक्त्या करण्यात आल्या.
गेल्या ३० वर्षापासून संभाजी ब्रिगेडने शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.'वैचारिक तरुणांची बलशाली संघटन' म्हणून संभाजी ब्रिगेडला ओळखले जाते.शेतकरी कष्टकरी, कामगार, विद्यार्थी व महिला यांच्या समस्या व प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेड दंड थोपटून या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे व '१००% समाजकारण व १००% राजकारण' हे ब्रीद घेऊन पुढे जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक, मराठा आरक्षण, ओबीसी संरक्षण आणि सर्वच जातीनिहाय जनगणना हे विषय अग्रस्थानी ठेवून "शेतीमालाला भाव व दारूमुक्त गाव" ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड 'गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता' निर्माण करीत आहे.
आणि म्हणूनच राजसत्ता हस्तगत करण्यासाठी संभाजी ब्रिगेड संपूर्ण तयारीनीशी निवडणुकीत मैदानात उतरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगरुळपीर तालुक्यात संभाजी ब्रिगेड पक्षाची बांधणी जोमात सुरु आहे. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बैठकीत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, तालुका प्रवक्ता शिवाजी गजभार, जिल्हा उपाध्यक्ष गणेश चिपडे, नयन कऱ्हे, योगेश ठाकरे, अनिल बोंबले, बबन आरु, सुमित मेटकर, ओम ठाकरे, श्रीकृष्ण भरदुक, नितीन मुळे, मनोज राऊत, आशिष खाडे, आकाश निकम, धीरज महल्ले, वैभव वाघमारे, हरीश गव्हाणे, शुभम बोबडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments