Ticker

6/recent/ticker-posts

उद्धव ठाकरे यांची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शनिवार बुलढाण्यात धडाडणार आहे. बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बुलढाण्यातील चिखली येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवसेनेने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी ३ वाजता हा मेळावा सुरू होणार असून या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. यावेळी शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यास होत 

लादल्या जाचक अटी ! उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती मेळाव्याचा मिचे सरकारने धसका घेतला आहे. त्यामुळेच या मेळाव्याला परवानगी देताना पोलिसांनी जाचक अटी घातल्या आहेत. मेळाव्यात 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे' आणि 'उद्धव ठाकरे आगे बढ़ो' या दोनच घोषणा द्याव्यात, मशाल पेटवण्यासाठी स्फोटक वा ज्वलनशील पदार्थ बाळगू नये, सभास्थळी कोणाच्याही भावना दुखावतील असे फलक लावू नयेत, भाषणात कोणतीही व्यक्ती, जाती- धर्माच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत.

Post a Comment

0 Comments