वाशिम जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या जंगलांसंबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभाग व वन विभागाचे समन्वय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन वन विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कारंजा लाड येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी
केले. दि. २२.११.२०२२ रोजी वन विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कारंजा लाड येथे मासिक गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जंगल क्षेत्रांमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांनी यावेळी बोलतांना अवैध वृक्षतोड, अवैधपने जंगल संपत्तीची वाहतूक, जाणीवपूर्वक जंगल क्षेत्राला लावण्यात येणाऱ्या आगी तसेच वन्यजीव गुन्हे नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने या बाबी कायद्याच्या चौकटीतून हाताळल्या गेल्या पाहिजे तसेच न्यायालयीन प्रक्रिया पार पाडताना प्रभावी यंत्रणा वन विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. तसेच आगामी काळात येणा-या सण-उत्सव व महापरीनिर्वाण दिनानिमित्ताने समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखत सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने व आनंदाने शांततेत पार पाडण्याचे आवाहन नागरिकांना केले. वाशिम जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक ती काळजी व खबरदारी घेण्याच्या आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. वाशिम घटकातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ०१ पोलीस अधिकारी व १७ पोलीस अंमलदारांचा सत्कार करण्यात आला.
सदर गुन्हे आढावा बैठक मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर बैठकोकरिता वनविभागाचे अधिकारी श्री. शैलेश मीना (ACF EGS). श्री. विपुल राठोड (ACF EGS), श्री अमित शिंदे (RFO, Karanja) श्री. छत्रपती चव्हाण (RFO, Washim). श्री जन्मेजय जाधव (RFO. Manora) श्री. संजय नांदुरकर (RFO, MS वाशिम), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रमुख पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
0 Comments