मंगरूळपीर येथील हुडको कॉलनी येथे त्रिमूर्ती संस्थान गोकुळधाम अशोक नगर पालखी सोहळा द्वारे कार्तिकी मास निमित्त हनुमान मंदिराच्या ठिकाणी आवळी पूजन व घरोघरी जाऊन तुळशी पूजन करण्यात येत आहे.
तुळशी माई ची वरात लगीन घाई जोरात असल्याने .
त्रिमूर्ती संस्थान गोकुळधाम अशोक नगर या पालखी सोहळ्या तील संतोष महाराज, राऊत, वाघमारे महाराज, चौधरी महाराज ,नारायण महाराज, भगवान महाराज, गोरले महाराज, सह महिला मंडळातील सुमन राऊत, सुमन भुमकर, शशिकलाबाई ,चंदाबाई, वंदनाबाई, कांता सम्राट आशा शोभा पवार वंदनाबाई राऊत बाई, सह महिला मंडळां सह घरोघरी जाऊन पूजन करीत आहेत.
तसेच या दिंडी सोहळ्याचा जागोजागी स्वागत होत असून दिंडीतील महाराज मंडळी मृदुंगांच्या तालावर ताल धरत तुळशी माईचे लग्न व आवळे पूजन करत आहेत.
या पालखी सोहळ्याचे पूजन सौ माधुरी ताई भुरके, पूजा भुरके ,आरती भुरके, प्रभाबाई गोरले , सीमाताई दंदे, राणीताई दंदे,सौ देवकाताई देवळे,, गुणाबाई विश्वकर्मा,मयूर भुरके,बालाजी विस्वकर्मा, नयनाताई विश्वकर्मा अनिता ताई निंबेकर, देवानंद गायकवाड, सह गजानन मंदिर परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.
0 Comments