एक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्या 'शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली', या वक्तव्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीका होत आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
'भाजपला शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय? अमोल कोल्हे संतापले
अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत म्हटलंय, सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य ऐकलं, आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं खुपतंय काय यांना? कधी भाजपाचे प्रवक्ते बोलतात, तर कधी महामहिम राज्यपाल बोलतात? वारंवार ही बेताल वक्तव्य महाराजांबद्दल का केली जातात? 'भाजपला शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय? असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय. 'माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे, हे शिवरायांनी अधोरेखित केलं ते भाजपला खुपतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
महाराष्ट्रातून टीकेची झोड
भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्या 'शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली', या वक्तव्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीकेची झोड उठत आहे. त्रिवेदींनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला- रोहित पवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे, "छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय
असे वक्तव्य करणारा ठार वेडाच- जितेंद्र आव्हाड
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात, शिवाजी महाराजांवर भाजपकडून असे वक्तव्य करणारा ठार वेडाच असू शकतो.
0 Comments