Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपाल, भाजप प्रवक्यांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

मंगरुळपीर शहरात शिवप्रेमी आक्रमक

मंगरूळपीर येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर  श्रद्धा असलेल्या शिवप्रेमीनी २१ नोव्हेंबर रोजी एकत्र येत निषेध नोंदविला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधाशु त्रिवेदी यांच्यावर कारवाई करुन दोघांनाही पदांवरून तत्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही विविध राजकिय पक्ष आणि सामाजिक संघटनानी एकत्र येऊन राज्यपाल व भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविल्याचे पहावयास मिळाले.

वाशिम : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. वाशिम शहरातील पाटणी चौकात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे, मनविसे, संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी एकत्र येत राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

रिसोड शहरात

उमटले तीव्र पडसाद रिसोड : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानाचे रिसोड शहरात २१ नोव्हेंबरला तीव्र पडसाद उमटले. रिसोड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच राज्यपाल आणि भाजपा प्रवक्त्यांना तत्काळ पदावरुन हटविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी, कार्यकत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली.

मानोरा येथे झेंडा चौकात निषेध

मानोरा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या विरोधात मानोरा शहरातील झेंडा चौकात एकत्र येत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निषेध आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष तर राज्यापाल आणि भाजप प्रवक्त्याच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्रची नव्हे, तर तमाम देशवासीयांचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवरायाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असे उपस्थितानी सांगितले.

Post a Comment

0 Comments