Ticker

6/recent/ticker-posts

वनोजा येथिल साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न


प्रतिनिधी:-  सचिन राणे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमच्या वतीने आज २१ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणेच्या वतीने एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे होते. मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक राजेश यावले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, सहायक पोलीस निरीक्षक कमलसिंह निनामा, व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी उपस्थित होते. 
या प्रशिक्षणात पुरस्थितीत बचाव व क्षतिग्रस्तांना मदत करावयाची साधने, त्यांचा वापर, संकटात अडकलेल्या व्यक्तिंना सोडविण्यासाठी वापरावयाच्या विविध उपाययोजना, त्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणे, प्रथमोपचार करणे, जखमी नागरिकांची रुग्णालयापर्यंत सुखरुप ने आण करणे, CPR देणे, यासह आदी याबाबत सविस्तर प्रात्यक्षिकासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणेच्या वतीने टीमने
मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला कार्यक्रमाला मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments