Wsm आवाज महाराष्ट्राचा वाशिम ,
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला सकाळी ७ ते दुपारी ५ या वेळेत मतदान घेण्यात आले. त्यात जिल्ह्यातील १९०५ पैकी १०० मतदारांनी आपला हक्क बजावला. ही टक्केवारी ४७.२४ आहे.
अमरावती विद्यापीठ सिनेटच्या ३७ जागांसाठी २०६ उमेदवार रिंगणात होते. या सिनेटच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागात एकूण ४० हजार ६२४ मतदार आहेत. त्यात प्राचार्य १११, महाविद्यालयीन शिक्षक ३४१३. व्यवस्थापनाचे प्रतिनिधी २३९, विद्यापीठ शिक्षक ५९ अभ्यास मंडळामधील सर्व विद्याशाखेमध्ये १०५५, तर पदवीधर मतदार ३५,६५९ आहेत. वाशिम जिल्ह्यात विद्यापीठ सिनेटचे एकूण १९०५ मतदार आहेत. त्यापैकी २०० मतदारांनी या
निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. यात रिसोड येथील केंद्रावर २२८ पैकी ११२, मालेगाव येथे ३०२ पैकी १३८, मंगरूळपीर येथे १९४ पैकी १०६, कारंजा येथे ३८५ पैकी १८५, मानोरा येथे १४४ पैकी ४४, तर वनोजा येथे ११ पैकी १० मतदारांनी मतदान केले.
आज होणाऱ्या मतमोजणीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
0 Comments