वाशिम : गत काही दिवसापासून जिल्हयात युरीया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता.
मात्र राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांची दि विदर्भ को. ऑपरेटीव्ह फेडरेशन नागपूरच्या संचालक पदी निवड झाली असता त्यांनी तातडीने शेतकर्यांच्या जिव्हाळयाचा प्रश्न असलेल्या युरीया खतांच्या तुटवडयाबाबत थेट दि विदर्भ कॉ ऑपरेटीव्ह फेडरेशनचे कार्यकारी संचालक एस हरिबाबु यांच्याशी संपर्क साधताच १३३५ मॅट्रीक टन युरीया खत दाखल झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वाशिम येथील रेल्वे स्थानकावर ८ जानेवारी रोजी १३३५ मॅट्रीक टन युरीया खताची रेल्वे मालगाडी दाखल झाली असून दि विदर्भ कॉ ऑपरेटीव्ह फेडरेशनचे जिल्हा पणन व्यवस्थापक विक्रम प्रकाशराव देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून युरीया खत वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हयात रब्बीचे पीक बहरले असतांनाच युरीया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. तातडीने युरीया खत उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत होती. अशातच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांची दि विदर्भ कॉ ऑपरेटीव्ह फेडरेशन नागपूरच्या संचालक पदी निवड होताच त्यांनी शेतकर्यासाठी तातडीने खतांच्या तुटवडयाबाबत थेट दि विदर्भ कॉ ऑपरेटीव्ह फेडरेशनचे कार्यकारी संचालक एस हरिबाबु यांच्याशी संपर्क साधून युरीया खतांच्या टंचाईबाबत चर्चा केली असता जिल्हयासाठी १३३५ मॅट्रीक टन युरीया ८ जानेवारी रोजी जिल्हयात रेल्वे रॅकने युरीया दाखल झाला असून सहाही तालुयात वितरकांमार्फत उपलब्ध होणार आहे. माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या प्रयत्नामूळे जिल्हयातील शेतकर्यांना युरीया उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असून भविष्यात आपण शेतकर्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असून जिल्हयात कुठेही युरीयाची टंचाई भासणार नाही, असे माजी मंत्री सुभाषराव ठाकरे म्हणाले तर वेळेवर युरीया उपलब्ध करुन दिल्याबददल शेतकर्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
0 Comments