मंगरूळपीर शहरालगतच्या पंचशिल नगर येथील पंचशिल बुद्धविहार येथे भिमा कोरेगांव शौर्य दिवस निमीत्त सामूहिक वंदना घेऊन 500 शूरविर योद्धांना स्मरण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले . याप्रसंगी पंचाशिल बुद्ध विहाराचे अध्यक्ष विनोद डेरे यांनी प्रथमतः दया क्षमा शांती करुणा मैत्रीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी धम्मसेवकआयु . पंजाबराव अघम व आनंदराव अघम यांनी मार्गदर्शन केले . याप्रसंगी सुशिलाबाई डेरे, सुंदर बाई नितनवरे, गिरजा भगत , आशा भगत,ममता अंबोरे, ( सदस्या .ग्रा.प.) सिमा डेरे, वर्षा अंबोरे, अनिता भगत , वंदना कांबळे,सविता मनवर, रिना इंगोले, शांताबाई भगत, वैशाली खिराडे, सोनाक्षी अंबोरे , ममता डेरे, सिध्दी खिराडे, सानवी डेरे, मानवी डेरे, यांचेसह राहूल इंगोले संतोष खंडरे यांची उपस्थिती होती .
******************************
0 Comments