जिल्हा परिषद वाशिम आरोग्य विभाग व जिव्हाळा फाउंडेशन मंगरूळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोतसांवगा या गावात भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आला.
या शिबिरास अध्यक्ष म्हणून अति. जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. वाशिम मा.डाॅ. देशमुख मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जीव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अश्विनीताई राम औताडे व डॉ. निलेश जामकर वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र कासोळा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.देशमुख मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाषणातून महिलांना सर्व तपासणी करण्यासाठी आव्हान केले व आपला आहार कसा असायला पाहिजे व आरोग्याची कशी काळजी घ्यायला पाहिजे तसेच गरोदर मातांनी आपला आहार कसा ठेवायचा याविषयी मार्गदर्शन केले. या गावातील महिला बीबे फोडण्याचे काम करतात त्यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सिकलसेल तपासणी, नेत्र तपासणी, बीपी तपासणी, शुगर तपासणी, थायरॉईड तपासणी तसेच K.F.T तपासणी, L.F.T तपासणी सर्व महिला व पुरुषांची करून दिली. या शिबिरात येणाऱ्या महिलांचे आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढून दिले. डॉ. निलेश जामकर सर,डॉ. गोडबोले( समुदाय आरोग्य अधिकारी) डॉ. अहिरकर (समुदाय आरोग्य अधिकारी) यांनी सर्व महिला व पुरुषांची तपासणी करून दिली. डॉ. अश्विनी गव्हाणे मॅडम यांनी सर्व महिला पुरुषांची नेत्र तपासणी करून दिली प्रशांत दयाळ (आरोग्य सहाय्यक) यांनी सगळी व्यवस्था केली. आरोग्य सेवक काझी यांनी सिकलसेल तपासणी केली. आरोग्य सेवक . डेरे व . वानखेडे यांनी नोंदणी करून घेतली. प्रमोद ढोबळे ( हिंदलॅब प्र.शा.तं) श्रीमती म्हैसने (आ.सहा.) व श्रीमती वाडेकर (आरोग्य सेविका) यांनी रक्त तपासणी केली. श्रीमती भगत (आरोग्य सेविका) यांनी औषधीचे वितरण केले. प्रशांत उगले (संगणक परिचालक,यशस्वी) यांनी आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढून दिले. महाजनकर सर,अंगणवाडी सेविका बेबी हजारे व आशा वेणुताई भोंडणे, भाग्यश्री कोकरे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन श्रीमती जैस्वाल मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन जिव्हाळा फाउंडेशनच्या अश्विनी ताई यांनी केले. गावातील सगळ्या महिला व पुरुष या शिबिरास उपस्थित होते महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या गावातील महिला बीबे फोडून आपला उदरनिर्वाह करतात त्या मुळेच महिलांना विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या गावांमध्ये बस येण्याची पण व्यवस्था नसल्यामुळे गावातील महिला रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करून घेत नाहीत. म्हणून बिबे फोडणाऱ्या महिलांसाठी खास करून या शिबिराचे आयोजन केले होते असे यावेळी अश्विनी ताई यांनी सांगितले. या शिबिरामध्ये मौत्सवंग्यातील 171 महिला व पुरुषांनी तपासणी करून घेतली.
0 Comments