मंगरुळपीर/
प्रतिनिधी:- येथील तहसील कार्यालय परिसरात अर्जनविस तथा मुद्रांक विक्रेते हे स्टॅम्प पेपर वर जादा पैसा आकारून जनतेची लुबाडणूक करत मनमानी कारभार चालवला असल्याची तक्रार येथील विधिज्ञ मंडळाचे वतीने विविध स्तरावर देण्यात आली.
निवेदनात पुढे नमुद करण्यात आले की विधिज्ञ मंडळाच्या पक्षकारांना मुद्रांक विक्रेते हे हेतुपुरस्सर स्टॅम्प पेपर देत नाहीत,आपल्या कार्यालयामार्फत मौजे मंगरूळपीर या करीता एकुण ३ मुद्रांक विक्रेते देत त्यांची नावे अनुक्रमे १) गजानन बळीराम लांभाडे, २) राजेश तुकाराम शिंदे, ३) दिलिप चंदुलाल रावपलाई हे आहेत. यांचे मार्फत नेहमीच विधिज्ञ मंडळातील सदस्य व पक्षकार यांना वेगवेगळ्या स्वरूपांची गैरवर्तणूक मिळते.ते खालीलप्रमाणे,
तिनही मुद्रांक विक्रेते हे मुद्रांक विक्री करत असतांना मुद्रांक विकत घेणाऱ्या व्यक्तीकडून जादाचे पैसे आकारत आहेत.तसेच सदर अतिरिक्त पैश्याबाबत जाब विचारल्यास अरेरावी करून उध्दट पणांची वागणुक देवुन मुद्रांक हवा असेल तर जादाचे पैसे द्यावेच लागतील अन्यथा मुद्रांक मिळणार नाही अशी गैरवर्तवणुक तिनही मुद्रांक विक्रेते यांचे मार्फत नेहमीच मिळत असुन त्यांची अशी गैरवर्तवणुक नित्यांचीच झाली आहे.
तसेच गैर न्यायिक मुद्रांक विकत घ्यावयास गेल्यास सदर मुद्रांक कशाकरीता पाहिजे व ज्या करीता पाहिजे असेल, अथवा त्या मुद्रांकावर जो काही व्यवहार करारनामा किंवा इतर काही लिहावयाचे असल्यास ते आमचे कडूनच लिहावे या करीता पक्षकार यांना बाध्य केले. जाते. तसे करण्यास नकार दिल्यास मुद्रांक हा पक्षकारांना विकल्या जात नाही व उलट तुम्ही कोणत्याही मुद्रांक विक्रेत्याकडे मुद्रांक विकत घेण्यास गेल्यास ते तुम्हाला मुद्रांक देणार नाही याची सुध्दा हमी घेतात. तसेच अरेरावीची भाषा वापरून असे धमकाविले जाते की, आमची राजकीय वर्तुळात ओळख असुन आमचे कोणीही बालबाका करू शकत नाही असे धमकाविले जाते.आज दिनांक ०३/०१/२०२३ विधिज्ञ मंडळातील विधिज्ञाचे पक्षकार नामे अक्षय गंगावणे हे मुद्रांक टिकीट आणण्याकरीता मुद्रांक विक्रेते नामे दिलीप चंदुलाल रावपलाई यांचे कडे गेला असता त्यांनी सदर इसमाला मुद्रांक टिकीट कशाकरीता पाहिजे अशी विचारणा केली, लाने सदर मुद्रांक तिकीट जमानत अर्जाला लावण्याकरीता पाहिजे असे सांगितले. त्यावरून सदर मुद्रांक विक्रेत्याने जमानतीचे सर्व अर्ज आमचे कडून तुला विकत घ्यावे लागतील अन्यथा सदर मुद्रांक टिकीट तुला मिळणार नाही अशी धमकी दिली.मुद्रांक विक्रेते नामे राजेंद्र शिंदे यांचे कडे विधिज्ञ मंडळातील सदस्य हे न्यायालयिन मुद्रांक विकत घेण्याकरीता गेले असता त्यांना रू. २००/- चे मुद्रांक हे रू. २४०/- ला विकत घ्याव लागतील असे सांगून बांधिल केले व त्याबाबत अतिरिक्त रक्कम देण्यास विधिज्ञ मंडळातील सदस्य तयार नसल्याने त्यांना सदर मुद्रांक विक्रेत्याने धमकाविले की, तुम्ही सर्व वकील लोक हे अतिरिक्त पैसे देत नाहीत. म्हणुनच आम्ही न्यायालयीन मुद्रांक सुध्दा तुमचे करीता उपलब्ध करीत नाही. त्यामुळे अशा गैरवर्तनाने सर्व वकीलांना न्यायालयीन शुल्कांपासुन वंचित ठेवुन न्यायालयीन कामकाजावर सदर मुद्रांक विक्रेते हे अडथळा निर्माण करीत आहेत.
सदर मुद्रांक विक्रेते यांना आपले कार्यालयामार्फत उपलब्ध करून दिलेल्या रूम मध्ये है आपले संगणक घेवून कार्यालयाशी संबंधीत सर्व कामे करीत आहेत व मुद्रांक सुध्दा संगणकीय टायपिंग करूनच विक्री करीत आहेत. वास्तविक पाहता सदर मुद्रांक विक्रेते यांना संगणकिय टायपिंग करण्याचा परवाना आपल्या कार्यालयामार्फत दिला गेलेला नसतांना सुध्दा त्याक पक्षकार व वकीलांना वाध्य केल्या जाते.सदर काही मुद्रांक विक्रेते यांना मुद्रांक विक्री करण्याचा परवाना केवळ आपले घरी विक्री करण्याकरीता दिलेला आहे. तरी सुध्दा ते मुद्रांक विक्रेते हे आपल्या गैरवर्तनामार्फत व राजकिय हित पाठबळ असल्याचे दाखवून मुद्रांक हे विद्यमान कार्यालयाच्या आवारात व रूम विनापरवाना विक्री करीत आहेत वर उल्लेखित तिनही मुद्रांक विक्रेते यांचे मार्फत मिळत असलेला गैरवर्तवणूक तथा मुद्रांक आमचे कडूनच टायपिंग करण्याकरीता होत असलेला छळ तसेच अतिरिक्त पैसे उकळत असल्याची बाब आणि त्यांना परवाना नसतांना कार्यालयाच्या परिसरात मुद्रांक विक्री करत असल्याची बाब हे सर्व गैरकृत्यू असुन या संबंधी त्यांचे वर दिनांक १५/०१/२०२३ पर्यंत योग्य ती त्वरीत कायदेशिर कार्यवाही करावी, अन्यथा सर्व विधिज्ञ मंडळामार्फत न्यायालयीन कामकाजावर मुद्रांक विक्रेते यांच्या विरोधात बेमुदत बहिष्कार करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.असे विविध स्तरावर विधिज्ञ मंडळा कडुन दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
-----------------------------------------------
0 Comments