.चंद्रकांतदादा ठाकरे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे मंगरुळपिर तालुका कार्याध्यक्ष मुकेश मुंजे यांच्या नेतृत्वाखाली गट ग्रामपंचायत दस्तापुर ,अंबापुर येथील निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत विरोधकाला धोबीपछाड देऊन सरपंचपदी सौ.पिंकीताई मुकेश मुंजे सह संपूर्ण उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून राष्ट्रवादीची एक हाती सत्ता राखून ग्रामपंचायत ची निवडणूक मध्ये माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे साहेब यांच्या आशीर्वाद व. चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शना विरोधकाशी दोन हात करून जनतेतून सरपंच पदी पिंकीताई मुकेश मुंजे यांचा दणदणीत विजय झाला .
तसेच दिनांक ४ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपसरपंच पदा ची अविरोध निवड आनंद चांगदेव आटपडकर यांची करण्यात आली असून राष्ट्रवादीचा गड कायम राखलाआहे.
उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे.के.मनवर ,मंडळ अधिकारी मेहकरकर मॅडम ,तलाठी दस्तापुर खिल्लारी तलाठी मंगरूळपीर व सचिव विजय वानखडे यांच्या उपस्थितीत पार पडली .
नवनिर्वाचित सदस्य श्रीकांत गणेश भगत ,मुकेश मुंजे, गोपाल खांडेकर, रिता आटपाडकर, राखी जामनिक, कमल कांबळे यांनी दिलेल्या शब्दाला सार्थ मान देऊन अविरोध उपसरपंच पदासाठी आनंद आटपाडकर यांची निवड केली .
सरपंच उपसरपंच व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे
गावकऱ्यांनी निवडीबद्दल जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments