अक्षय्य तृतीयेला शेतात करण्यात येणाऱ्या घट मांडणी
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत आज जाहीर झालं आहे.
सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदाचे वर्ष बळीराजासाठी सर्वसाधारण असे असणार आहे.भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात कमी पाऊस असेल, जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असेल असं सागण्यात आलं आहे.शेतकऱ्यांना यंदाही अतिवृष्टीचा फटका बसेल असं भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आलं आहे.राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तवताना राजा स्थिर असेल असं म्हटलं आहे.तर घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असेल असं भविष्य वर्तवण्यात आलं आहे.चैत्र शुद्ध दशमीला ही मांडणी उघडली जाते. यावर्षीच्या निरीक्षणात पारावरील मांडणीभोवती तब्बल ४० वर्षांनंतर विंचू आढळून आला. यामुळे हे वर्ष विषारी वर्ष असेल असे यावेळी सारंगधर महाराज यांनी सांगितले. झुरळ, म्हैस, विंचू, पिशवा, गाढव, वसु असे कीटक आढळून आले. गंगाळामध्ये मुंग्या व वाणी मोठ्या संख्येने आढळले. त्यामुळे पिकांना यावर्षी वाण्यांपासून जास्त नुकसान संभवते, असे यावेळी सांगण्यात आले. करंजीची भुकटी झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही सारखी राहणार नाही. ती कमी जास्त होऊ शकते, असा अंदाजही यावेळी वर्तवण्यात आला.
0 Comments