14 मे रोजी मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम कोळंबी येथे गवळी समाज समूहिक विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यात 12 जोडपे विवाह बंधनात बंधले गवळी समाज समूहिक विवाह सोहळ्याला 22 वर्ष पूर्ण झाले या सामूहिक विवाह सोहळ्याची शुरुवात कोळंबी येथील दिलीप भाऊ मोहनावले महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य काँग्रेस कमिटी मा .जि.प. सदस्य वाशिम यांनी 2001 साली केली होती हा सोहळा दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दिलीप भाऊ मोहनावाले यांच्या नेतृत्वात संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन जुबेर मोहनावाले युवा सेना जिल्हाप्रमुख अध्यक्ष युवा गवळी समाज संघटन वाशिम व कोळंबी येथिल युवकांनी केले होते. यावेळी सर्व राजकीय पक्षीय नेते वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. व कोळंबी, दिग्रस, मंगरुळपीर, कारंजा, हेंद्राबाद, भुसावळ, मेहकर येथिल गवळी समाज बांधव उपस्थिती होते . परिस्थितीचा आणि काळाचा विचार करून सामूहिक विवाह सोहळा अशा पद्धतीने साजरे झाले तर आपण व आपल्या परिसरातील समाज बांधव कर्जबाजारी होणार नाही अनाठाही होणारा खर्च टाळल्या जाईल व वधू-वरांना योग्य बचतीचे महत्त्व कळेल हा या मागचा विवाह सोहळ्याचा उद्देश समाज बांधवांनी समजून घ्यावा बावीस वर्षाची परंपरा कायम सामूहिक विवाह सोहळा थाटात संपन्न
0 Comments