Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा, किशोर देशमुख

आता मावळे होणे काळाची गरज
 तराळा तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मंदिरामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गावातील सर्व युवक एकत्रित येऊन छत्रपती संभाजी राजांची जयंती साजरी करण्यात आली
 याप्रसंगी गावातील तरुण जेष्ठ नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
 छत्रपती संभाजी राजे यांच्या  प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्वच नागरिकांनी केले
 त्यानंतर विविध मान्यवरांचे विचार व्यक्त करण्यात आले
 घरापासून देश गाव पातळीपर्यंत समाज विकासाचे कामे हाती घेणे स्वतः समाजामधील निष्क्रियता आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी युवकांनी उच्च शिक्षण घेऊन आदर्श लोकप्रतिनिधी व आदर्श अधिकारी निर्माण व्हावा हीच अपेक्षा  छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी व्यक्त केली
 मग गावातील स्वच्छता असो गावातील वादग्रस्त विधाने असो गावातील किरकोळ वाद असो आफसातील वाद मिटवण्याचे काम यानिमित्त सर्वांनी केलं पाहिजे गाव विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व एकत्रित आले पाहिजे यामधूनच देश घडतो गाव घडते आणि समाजही घडतो यालाच देशोन्नती म्हणतात
 छत्रपती संभाजी राजांचा आदर्श वाचण्यातूनही वाचता आले नाहीत असे अनेक उदाहरण अनेक वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून ही ती आज आपल्यापर्यंत पोहोचली आहे परंतु त्याहीपेक्षा अनेक उदाहरणं वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या शब्दातून आपण ऐकतो आणि छत्रपती संभाजीराजांनी समाज हितासाठी देशासाठी धर्म रक्षणासाठी काय केले स्वराज्य रक्षक म्हणून त्यांना आज गौरवण्यात येते छत्रपती संभाजी राजांचे नाव घेतल्याबरोबर तरुण युवक गदगदुण जातो त्यामुळेच आपण राजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो पण त्याचा संघर्ष कसा होता? समाजाप्रती समाजातील निष्ठा देशाची निष्ठा धर्मासाठी निष्ठा हे सर्व पाहून प्रत्येक युवकांनी किमान नाही तरी का शब्दाचा अर्थावर जीवन तत्त्व म्हटलं किंवा एका शब्दाचा अर्थावरील महाराजांचा विचार समाजामध्ये रुजवतो  म्हटलं तरी प्रत्येक युवकांनी मनातील मावळा जागृत ठेवणे ही काळाची गरज आहे. छत्रपती महाराजांची जयंती केवळ आज आहे म्हणून नाही तर महाराजांच्या थोर पुरुषांच्या जयंती प्रत्येक घराघरात प्रत्येक समाजात आणि प्रत्येक दिवशी झाली पाहिजे अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे तरच खरं समाज एक संघ राहील असे विचार समाजसेवी किशोर देशमुख यांनी व्यक्त केले
 प्रसंगी गावातील बहुसंख्या तरुण ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
  देशमुख ,रणजीत पाटील गावंडे ,मोहन पाटील गावंडे ग्रामपंचायत सदस्य ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिराचे व्यवस्थापक विश्वास पाटीलसंजय गावंडे, नकुल गावंडे ,रमेश गावंडे, गजानन गावंडे ,कृष्णा गावंडे, नकुल गावंडे ,गितेश गावंडे, अक्षय गावंडे, शिवा गावंडे, चेतन गावंडे, रामा गावंडे ,रामा घोडे, उमेश गावंडे ,कृष्णा गावंडे, रंजीत गावंडे, रमेश गावंडे, संतोष गावंडे, मोहन गावंडे , इत्यादी गावातील तरुण युवक

Post a Comment

0 Comments