Ticker

6/recent/ticker-posts

ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. तारादेवी ललवाणी यांच्या तसबिरीचे अनावरण व महिलांसाठी कुंभारी कृषी पर्यटन केंद्राला भेट

भुसावळ- येथील ललवाणी फाउंडेशन या संस्थेतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम .ललवाणी यांच्या मातोश्री च्या स्मृतीदिनानिमित्त ललवाणी फॉर्म मध्ये गणेश मंदिरात स्व. तारादेवी ललवाणी यांच्या तसबिरीचे ललवाणी परिवाराचे अर्ध्वयु मदनलाल ललवाणी यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ललवाणी परिवारातील नलिन ललवाणी, सौ.मनीषा कर्नावट, मानस ललवाणी, व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित उपस्थित होता . याप्रसंगी स्व. तारादेवी ललवाणी यांच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणवले. त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ.शोभा ललवाणी यांनी महिलांसाठी कुंभारी येथील जगात भारी कृषी पर्यटन केंद्रास सहलीचे आयोजन करून माहेरचा आहेर या कार्यक्रमास उपस्थिती दिली .यावेळी जवळपास 50 महिलांना त्यांनी  ही माहेरची वारी घडवून आणली .यामध्ये सर्वधर्मीय  महिलांचा समावेश होता. या माहेरच्या वारी कार्यक्रमात महिलांनी येथेच्छ आनंद लुटला. या आनंदात विविध प्रकारचे खेळ, स्पर्धा, सफारी, रेन डान्स यांचा समावेश होता. तसेच या केंद्राचे संचालक प्रभाकर साळवे  व सौ.ज्योती साळवे यांनी सुद्धा या आनंदात सहभाग घेऊन एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम घडवून आणला. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील ज्युनिअर भाऊ कदम यांनी विविध प्रकारे मीमीक्री करून महिलांचे मनोरंजन केले.  प्रभाकर साळवे यांनी अनेक रोगांवरील औषधोपचाराची माहिती दिली. त्याचप्रमाणे खेड्याकडे चला या उक्तीप्रमाणे व तसेच कृषी क्षेत्रातील अनेक बाबी समजून सांगितल्या .महिलांनी घोडा सफारी ,बैलगाडी सफारी, जंगल सफारी आदींचा मनमुराद आनंद घेऊन बारा बलुतेदार ही संकल्पना समजून घेतली. कार्यक्रमस्थळी सर्व महिलांचे हळदी ,कुंकु, अक्षता लावुन स्वागत करण्यात आले.माहेरचा आहेर या कार्यक्रमात  भुसावळ येथून गेलेल्या ललवाणी फाउंडेशनच्या सहभागी महिलामधील पहिलं बक्षीस सौ.मयुरी राहुल संचेती यांनी दोन ग्रॅम सोन्याची अंगठी तर वंदना ढाके यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले.
मंगला कोटेचा यांनी या ऊपक्रमाचे कौतुक करुन मनस्वी आनंद झाल्याचे नमुद करुन ललवाणी फौंडेशन ने आम्हा महीलांसाठी ही संधी ऊपलब्ध करुन दिल्याबाबत आभार व्यक्त केले.सौ.कल्पना गादिया,सौ.लता सिसोदिया,सौ,जयश्री बोथरा,सौ.संगिता मुगदिया,सौ.संगिता मंडलेचा,सौ.कल्पना नाहार,सौ.आशा मगरे,सौ.वैशाली मुन,सौ.रिटा छेडा,सौ.पुनम कोळी,सौ.कविता डोंगरे,सौ.दिपा गादिया,सौ.मधु ललवाणी,सौ.मयुरी संचेती,सौ.कुंदन छाजेड,सौ.सुनिता गादिया,सौ.किर्ती कोटेचा,सौ.खुशबु सिसोदिया,श्रीमती सुनिता कुंभार,सौ.छाया ईंगळे,सौ.राधा शर्मा,सौ.ऊज्वला साखला,सौ.मोना बोरा,सौ.सोनल साखला,आदि असंख्य महिलांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेवुन धमाल केली व ललवाणी परीवाराचे व प्रभाकर साळवे परिवाराचे कौतुक केले.कार्यक्रम उपरांन्त सर्वानी खास गावरान मेनु गोवरीवरील बट्टी,साधी दाल,कांदे भाजी,पातोडी भाजी,झणकेदार ठेचा चा आस्वाद घेतला.

Post a Comment

0 Comments