Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथे श्री संत वासुदेव महाराज पालखीचे भक्ती भावाने फटाकेची आतिशबाजी करून स्वागत. . श्रीसंत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ.

              

अकोला.............................. (पंढरपूर येथून थेट पालखी मधून).   श्री क्षेत्र श्रद्धा सागर अकोट येथून निघालेली श्रीसंत वासुदेव महाराज पालखीचे संध्याकाळी पंढरपूर नगरीमध्ये पोचली .सर्वप्रथम संपूर्ण दिंडी चंद्रभागेच्या तीरावर ज्या ठिकाणी वासुदेव महाराजांना अग्नी दिला होता त्या ठिकाणी जाऊन सर्व वारकऱ्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केले. त्यानंतर महाराजांना अभिषेक केला. त्यानंतर आरती, पावली फुगड्यांचा वारकऱ्यांनी अत्यानंद घेतला. त्यानंतर वारी पंढरपूर येथील श्री संत वासुदेव महाराज मठामध्ये गेली .त्या ठिकाणी फटाक्यांची आतिश बाजी , पावली ,फुगड्या व अभंगाच्या तालामध्ये विठुरायाच्या गजरामध्ये वारकरी मंडळी रंगून गेली .रोशनी, फुलांची उधळान, महाआरतीने व संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले पाटील यांच्या मार्गदर्शनाने पालखीचा समारोप करण्यात आला. पालखीचे धार्मिक विधीप्रमाणे भक्ती भावाने स्वागत करण्यात आले. सर्व पालखीतील वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला . पालखीचा पंढरपूर नगरी मध्ये अनेक ठिकाणी पालखीचे   स्थानिक नागरिकांनी जागोजागी   स्वागत केले . नगरवासीयांनी पालखीचे चौका चौकात स्वागत तसेच दर्शन घेतले . पालखीचा आनंद उत्सव वारकऱ्यांनी मोठा आनंदात साजरा केला. जागोजागी विठू रायाचा नामाचा गजर, तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, संत वासुदेव महाराज यांच्या नामस्मरणने पंढरपूर नगरी दुमदुमून गेली होती. तसेच रस्त्याने सुद्धा वेगवेगळ्या अभंगाणी, भावगीताने, तसेच फुगड्या पावली खेळून पालखीतील वारकरी भक्ती सागर मध्ये लिन झाले होते. त्यानंतर पालखी रात्रीचे मुक्काम साठी पंढरपूर येथील श्री संत वासुदेव महाराज मठामध्ये आगमन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक २६ ला श्री संत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी काकड आरती भजन त्यानंतर सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण अकरा वाजता प्रवचनाने सकाळच्या कार्यक्रमाचा  समारोप झाला. 
रात्री कीर्तन  कार्यक्रम पार पडला .त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  आज या पालखीला अकोट वरून निघून पंढरपूर पर्यंत पोहोचण्यासाठी  २५ दिवस पूर्ण झाले आहे .तरीही वारकऱ्यांमध्ये भक्तगणामध्ये तोच जोश, तोच उत्साह आनंदामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहे .पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन हे सगळे वारकरी पंढरीनाथाच्या नगरी मध्ये पोचले व विठुरायाचे दर्शन घेतले . आता या ठिकाणी दिनांक 26 जून ते ३ जुलै 2023 पर्यंत महाराजांचा  पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून रोज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कीर्तन, प्रवचन ,ज्ञानेश्वरी पारायण ,भजन ,पावली ,  हरिनाम , अखंड अन्नदान आदीचे आयोजना सोबतच रोज सकाळ संध्याकाळ वारकरी व पंढरपुरात आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन या मठांमध्ये करण्यात आले आहे. तसेच मठामध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. अशा या पालखी सोहळ्याचे नेतृत्व श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष श्री ह भ प वासुदेव महाराज महल्ले पाटील हे करीत असून त्यांनी स्वतः या वारीमध्ये पैदल  प्रवास केला असून त्यांच्यासोबत २०० वारकरी यामध्ये दहा वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या म्हातारापर्यंत स्त्री पुरुष सहभागी झाले होते . 

तसेच या पालखीचे व पुण्यतिथी महोत्सवाचे उत्कृष्ट व्यवस्थापन श्री ह भ प अंबादास महाराज मानकर हे करीत आहेत. तसेच ह भ प महादेवराव ठाकरे व ह भ प गजानन दुधाट यांच्या मार्गदर्शनात विश्वस्त  अनिल कोरपे, श्रीराम कोरडे, नागोराव बायसकार, ज्ञानेश्वर नराजे , अनिल नराजे, पंकज कुलट, उमेश मोहकार, संतोष मंगळे, अविनाश सावरकर, बापजी शिंदे, रवी मते, बाळकृष्ण वाकोडे, गोपाळराव मंगळे, व सर्व वारकरी भक्त व सर्व महाराज मंडळी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था तीर्थक्षेत्र श्रद्धा सागर अकोट जिल्हा अकोला हे परिश्रम घेत असून हा पालखी सोहळा व श्री संत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सव यशस्वी करण्याकरीता मेहनत घेत आहे अशी माहिती या वारीमध्ये सहभागी असलेले वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे थेट दिंडी व पुण्यतिथी महोत्सव पंढरपूर येथून  दिली आहे.       

Post a Comment

0 Comments