Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळनाथ समता परिषद ची कार्यकारिणी जाहीर




मंगरूळनाथ/प्रतिनिधी
 :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा समता परिषद संस्थापक मा.छगणरावजी भुजबळ साहेब यांचे आदेशानुसार,  समता परिषदेच्या मंगरूळ पिर तालुका व शहर कार्यकारिणी नव्याने नियुक्त करण्या संदर्भात दिनांक २6/०६/२०२३ रविवारी स्थानिक विश्राम ग्रुहात रवीभाऊ सोनुवने यांचे प्रमुख उपस्थितीत पार पाडल्या.यावेळी समता परिषदेच्या तालुका अध्यक्ष पदी तुषार जवके,तर शहराध्यक्षपदी राजेश मानेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
       यावेळी, प्रमुख मार्गदर्शक समता परिषदेचे आणी भुजबळ साहेबांच्या अती निकटवर्तीय मा. लक्ष्मणराव जवके तर समता परिषदेचे पच्छीम विदर्भ अध्यक्ष मा. प्रा.अरविंद गाभणे, नागेश गवळी , पांडुरंग भाऊ कोठाळे, संतोष ऊर्फ बाबासाहेब काळे, वसुदेवराव शिरसागर, विजय मानेकर, मोहन राऊत, दिनकर डोंगरे,राजू राऊत, मोहन वानखडे, यांचे प्रमुख उपस्थितीत समता परिषद मंगरूळनाथ तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, माळी समाजच नव्हे तर अठरा पगड जातीतील तरूनांना समता परिषदेच्या विचारधारेत आणन्याचा प्रयत्न केला जाईल,कसे यावेळी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी संकल्प केला असुन,गोर गरीब जनतेसाठी व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहील असेही यावेळी तुषार जवके व राजेश मानेकर या दोन्ही तरूण अध्यक्षांनी उपस्थितांना ग्वाही दिली, यावेळी समता परिषद मध्ये सागर क्षिरसागर,निलेश ढोमणे, संतोष मांडवगडे, ओम इंगळे, अजय मानेकर, ओम घोडे, विशाल शिरसागर, विकी बोबडे, उमेश राऊत, सागर कडूकार, आकाश बोधे, राम शिरसागर, अजय डाकुलकर, अमोल क्षीरसागर, आकाश घोडे,   यांची वर्णी लागणार असुन, नियुक्ती करण्यात आलेल्यांना ंं यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी समाजातील व इतर समाजातील तरूणाई ची  उपस्थिती होती .


Post a Comment

0 Comments