दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे महागाई वाढून त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.अश्याप्रकारचा जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार तसेच काळाबाजार रोखण्यासाठी साठेबाजी/काळाबाजारी करणाऱ्यांविरोधात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ नुसार कारवाया करण्यात येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर दि.२२.०६.२०२३ रोजी प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे पो.स्टे.वाशिम शहर हद्दीतील वाशिम ते हिंगोली रोडवरील उड्डाणपुलाजवळ वाहन तपासणी करत असताना एक इसम जीवनावश्यक धान्य राशनचे गहू तांदुळाची अवैधपणे वाहतूक करून काळाबाजारी करतांना आढळून आला. त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांनी पथकासह तेथे जाऊन पंचासमक्ष बोलेरो पिकअप वाहन क्र.MH37J0732 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये राशनचे गहू असलेले ३७ कट्टे ज्याची अं.किं.३६,०००/-रु. आढळून आले. सदर प्रकरणी गणेश शेकुराव चीलगर, प्रवीण भगवान व्हडगिर व नितीन माणिकचंद बियाणी, सर्व रा.कन्हेरगाव यांचेवर पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५२९/२३, कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्याचबरोबर बिलाल नगर मधील गोडावून मध्ये राशनचे धान्य साठवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून पंचासमक्ष सदर गोडावूनवर छापा कारवाई केली असता त्यामध्ये ४० कट्टे तांदूळ व ६८ कट्टे गहू असे एकूण १०८ कट्टे धान्य अं.किं.१,०७,०००/-रु. व एक टाटा-२०७ वाहन क्र.MH04Y242 अवैधपणे विनापरवाना शासकीय स्वस्त धान्य दुकानात वितरीत करण्यात येत असलेला गहू-तांदळाचा साठा व चारचाकी वाहन आरोपी नामे मोहम्मद फहीम मोहम्मद अकबर, वय ४० वर्षे, रा.बिलालनगर, वाशिम याचे ताब्यात आढळून आले. सदर ठिकाणी त्यांना धान्याचा परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता ते कोणत्याही प्रकारचा परवाना व कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांचेवर पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५२८/२३, कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशाप्रकारे ०२ कारवायांमध्ये ०४ आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वये अवैधपणे विनापरवाना धान्यसाठा केल्याने गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण ४,४३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांच्या नैतृत्वाखाली पो.स्टे.वाशिम शहरच्या पथकाने पार पाडली. जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार करत साठेबाजी व काळाबाजार करून नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये बाधा निर्माण करू पाहणाऱ्या साठेबाजांवर वाशिम पोलीस दल लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही त्यांना आढळलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या गैरप्रकाराबाबत वाशिम जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास (संपर्क क्र. ०७२५२-२३४८२४), DIAL 112 किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम
0 Comments