वाशीम : येथील ग्रामीण पोलीस स्टेशनंतर्गत कार्यतर असलेला कर्मचारी महामार्गावर वाहने अडवून नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यामुळे सदर कर्मचाऱ्याची चौकशी करुन त्याची उचलबांगडी करावी अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष प्रकाश महाले यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीव्दारे केली आहे़
या संदर्भात दिलेल्या पत्रात नमुद आहे की, ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले समाधान जायभाये हा कर्मचारी मालेगाव मार्गावर तसेच वाशीम पुसद, मंगरुळपीर व हिंगोली मार्गावर दुचाकी, चारचाकी व आॅटो रिक्षा ही वाहने राजरोसपणे अडविली जातात यावेळी वाहनधारकांकडे कागदपत्र उपलब्ध असताना सुध्दा वाहनधारकांकडून बेकायदेशीरपणे वसुली करण्यात येते अशा प्रकाराने कंटाळलेल्या वाहनधारकांनी खा़ भावना गवळी यांचे जनसंपर्क कार्यालयात येवून तशा तक्रारी केल्या आहेत़ सदर प्रकार हा पोलीस प्रशासनाच्या शिस्त व नियमांचे उल्लंघन आहे़ त्यामुळे सदर कर्मचाऱ्याची चौकशी करुन त्याची बदली करावी अशी मागणी प्रकाश महाले यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीव्दारे केली आहे़.
0 Comments