Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर शहरांतील अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी

 शेख नवेद व अतिक्रमणधारकांचे तहसीलदाराना निवेदन मंगरुळपीर शहरांतील अतिक्रमण लघुव्यावसायिकाना तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख नवेद यांनी उपविभागीय अधिकारी यांना दि 6 रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे

सदर निवेदनाचा आशय असा की ,मंगरूळपीर शहरात अनेक अतिक्रमण धारक लघुव्यवसाय आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र नुकत्याच पार पडलेल्या अतिक्रमणं मोहीम राबविण्यात आल्यामुळे लघुव्यवसायिका समोर उपजीविका कशी करावी हा यक्ष्रप्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे 
अतिक्रमणधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर करून त्यांच्या जगण्या मरण्याचा विचार करून पूर्ववत व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध देण्यात यावी , अतिक्रमणधारकांनी व्यवसायाच्या उभारणीसाठी बँका व इतर माध्यमातून व्याजाने पैसे घेतले असून , आता व्यवसाय बंद पडल्यामुळे बँकांचे हप्ते कसे फेडावे हा प्रश्न उभा राहला आहे . नपच्या कारवाईमुळे अतिक्रमणधारक निराशेच्या गर्तेत सापडले असून , आत्महत्येसारख्या रोखण्यासाठी पूर्ववत व्यवसाय विचारापासून करण्यास परवानगी द्यावी किंवा शासनाकडून पर्याची जागा द्यावी , अशी मागणी अतिक्रमणधारक बेरोजगार युवकांकडून करण्यात आली आहे . यातील काही लघुव्यवसायिक उच्चविद्याविभूषित आहेत . मात्र , त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून नोकऱ्या मिळत नसल्यामुळे बेरोजगार नाईलाजाने लघुव्यवसाय करून आपाले पोट परिवाराची मोठी उपासमार होत आहे . सदर अतिक्रमण मोहीम अद्याप सुरूच असून त्यांना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येत आहे . व व्यवसाय केल्यास आर्थिक दंड केल्या जात आहे . त्यामुळे त्यांचे व्यवसाय बंद म्हणून भरावे लागत आहे . सरकारी जागेची देतांना सुशिल बैठक फी सुध्दा नियमित देत आहेत . पडले असून ,, नगरपरिषदेच्या व्यावसायि झाला आहे . यापैकी अनेक मोहिमेमुळे व्यवसाय बंद पडले असून , अतिक्रमण व्यावसायिकांपुढे उपासमारीची वेळ आली आहे . शासन , प्रशासन व नगरपरिषद आणि पोलिस विभागाकडून सातत्याने सुरू असणारी अतिक्रमण मोहीम आणि दंडात्मक कारवाईमुळे सरकारी जागेवर व्यवसाय करून पोट भरणारे बेरोजगार युवक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत . या सन्मानाने अतिक्रमणधारकांना व्यवसाय करू देण्यासाठी प्रशासनाने पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी शहरातील लघुव्यवसायिकांनी 1 जून रोजी जिल्हाधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली निवेदनात नमुद केले आहे
या निवेदनावर यूनूस खान, राजेश जाधव, प्रमोद भगत, चंद्रकांत देवळे पाटील, दीपक सोळंके, मो नावेद, गोपाल आमटे, सुजित भगत, अजय गवारगुरु, सोहम इंगळे, रितेश चव्हाण, चीकू भुसारे, प्रेम भोसले, बशीर शेख, आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

0 Comments